पुणे : पुणे जिल्हा एका तरुणाच्या हत्येने हादरला आहे. संबंधित घटना पुण्यातील चाकण येथे घडली आहे. विशेष म्हणजे चाकण मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडीच्या मैदानात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. संबंधित घटना ही संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा तरुण बिहारचा रहिवासी असून त्याची नेमकी हत्या का झाली? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
चाकणमध्ये पीडब्ल्यूडीच्या मैदानात दुपारच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरची एकंदरीत परिस्थिती बघता त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या झाल्याचं निदर्शनास आलं. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी परिसरात तपास केला.
संबंधित मृतक हा सोळा वर्षांचा आहे. तो बिहारचा रहिवासी आहे. तो बऱ्याच दिवसांपासून चाकणमध्ये राहत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड टाकून हत्या केली, असं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच पोलिसांनी संबंधित परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार काही संशयितांची माहिती मिळाली आहे. त्याचबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
दुसरीकडे कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीने तिची हत्या केल्याचा संशय आहे. सध्या खडकपाडा पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने हे पोलिस पथकासमोत घटनास्थळी दाखल झाले. जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.
सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा :