Pune : नाहीतर मुलाचा मृत्यू होईल… जादूटोण्याच्या बहाण्याने पुण्यात लुटले 35 लाख

मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यासाठी पीडित कुटुंबाकडून तब्बल 35 लाख रुपये उकळण्यात आले. एवढेच नव्हे तर तर त्यांच्याकडे आणखी 50 लाखांची मागणी करण्यात आली.

Pune : नाहीतर मुलाचा मृत्यू होईल... जादूटोण्याच्या बहाण्याने पुण्यात लुटले 35 लाख
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 12:39 PM

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 19 जानेवारी 2024 : विद्येचे माहेरघर, सुसंस्कृतांचे शहर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक, अघोरी प्रकार समोर आला आहे. मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यासाठी पीडित कुटुंबाकडून तब्बल 35 लाख रुपये उकळण्यात आले. एवढेच नव्हे तर तर त्यांच्याकडे आणखी 50 लाखांची मागणी करण्यात आली, ते पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाचा मृत्यू होईल असेही धमकावण्यात आले. पुण्यातील चंदननगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.

अघोरी पूजा करत 35 लाख रुपयांची भोंदू बाबा कडून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंदन नगर पोलीस स्टेशन मध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याकरता स्मशान भूमीमध्ये जाऊन अघोरी पूजा करून, पूजेचा व्हिडिओ मित्राला पाठवून देण्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर हद्दीमध्ये घडला होता. त्यातच आता ही नवी अघोरी पूजेची नवी घटना उघडकीस आली आहे.

मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी अघोरी पूजा

पुण्यातील चंदन नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित कुटुंबातील मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा करण्यात आला. घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि मुलाची मानसिक आजारातून मुक्तता करण्यासाठी आरोपींनी पीडितांचा विश्वास संपादन केला आणि अघोरी विद्या केली. आरोपींनी अघोरी विद्या करून जादूटोण्याच्या मंत्राच्या सहाय्याने 35 लाख रुपये उकळलेत. याप्रकरणी चारुदत्त मारणे याच्यासह चार जणांवर चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

50 लाख द्या नाहीतर घराचा नायनाट होईल

एवढंच नव्हे तर आरोपी मारणे याने पीडित कुटुंबियांकडे आणखी 50 लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाहीत तर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल, तुमच्या घराचा नायनाट होईल असं बोलून फिर्यादीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी पीडित महिलेने चंदन नगर पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली होती. त्यानतंर पोलिसांनी चार जणांविरोधात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.