पुण्यातील ‘त्या’ स्फोट प्रकरणावर एटीएसला मोठा संशय, दुकानातील स्फोट प्रकरणी सुरू केला तपास
पुण्यातील सहकार नगर येथे सोमवारी पहाटेच्या वेळेला झालेल्या स्फोट प्रकरणी एटीएसकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या तपासामुळे पुण्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पुणे : पुण्यातील सहकारनगर मध्ये सोमवारी पहाटे इलेक्ट्रॅानिक्स दुकानात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात दोन काही नागरिक गंभीर जखमी झाले होते. तर एक दुचाकी देखील जळून खाक झाली होती. त्यामध्ये टीव्हीचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. त्यामुळे स्फोटाची परिस्थिती पाहता पुणे एटीएसकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सहकार नगर येथील संपूर्ण स्फोटाचा तपास एटीएसच्या पथकाकडून केला जात आहे. खरंतर या स्फोटानंतर रस्त्यावर अनेक वस्तु आल्या होता.
टीव्हीचा स्फोट होता की आणखी काही याचा संशय तपास करत असतांना पोलिसांना आल्यानंतर आता एटीएसच्या माध्यामातून हा तपास केला जात आहे. त्यामुळे पुणे शहरात सहकार नगर मध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी पहाटे स्फोट झालेल्या दुकानात होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व आणि मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या.
याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पुर्ण जळाली होती.
भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते आहे. त्यामुळे यामध्ये काही संशय तपास यंत्रणेला आल्याने आता एटीएसकडून कसून तपास केला जात आहे. त्यामुळे या तपासात काही आढळून येते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.