AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : बायकोला गोड बोलून घाटात बोलावलं, त्यानंतर त्याने असं काही केलं… अखेर तीन महिन्यानंतर…

काही दिवसांपूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली. त्या धक्क्यातून पुणेकर सावरतात न सावरतात तोच आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला बाहेर नेऊन पतीने तिची हत्या केली.

Pune : बायकोला गोड बोलून घाटात बोलावलं, त्यानंतर त्याने असं काही केलं... अखेर तीन महिन्यानंतर...
| Updated on: Jan 16, 2024 | 11:53 AM
Share

पुणे | 16 जानेवारी 2024 : विद्येचं माहेर अशी ख्याती असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हे वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली. त्या धक्क्यातून पुणेकर सावरतात न सावरतात तोच आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला बाहेर नेऊन पतीने तिची हत्या केली. ललिता जाधव असे मृत महिलेचे नाव असू न अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) असे आरोपीचे नाव आहे.

अमोलसिंग हा त्याच्या पत्नीला देवदर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे घेऊन गेला, मात्र त्याने तेथे तिला दरीत ढकलले. पण झाडाला अडकल्याने बचावली, तेव्हा कोणतीच दयामाया न दाखवत आरोपी अमोलने तिच्याच साडीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खुनामागचे धक्कादायक कारण पुढे आले आहे.

पत्नी बेपत्ता झाल्याची केली तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी ललिता बेपत्ता झाल्याची तक्रार अमोलसिंगने दिली होती. त्यानंतर पोलिस ललिताचा शोध घेत होते. दरम्यान, अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू होता.दरम्यान वर्षभरानंतर पोलिसांना या प्रकरणी महत्वाची माहिती मिळाली. त्यानुसार संशयाची सुई ही पती अमोलसिंगवर गेली. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने ललिताचा खून केला आल्याची कबुली दिली.

या कारणामुळे केली हत्या

अमोलसिंगने आणि ललितामध्ये दहा वर्षांचे अंतर होते. कुटुंबीयांच्या दबाबामुळे त्याने ललिताशी विवाह केला. मात्र, दोघांचे कधी पटले नाही. त्यांच्यात सातत्याने वाद व्हायचे. त्यामुळे अमोलसिंहला ललितापासून वेगळं होऊन घटस्फोट घ्यायचा होता. तशी मागणी देखील त्याने तिच्याकडे केली होती. मात्र, तिने त्यासाठी नकार दिला. यामुळे त्याचा तिच्यावर राग होता. यामुळे त्याने ललिताचा खून करण्याचे ठरवले.

28 ऑक्टोबर रोजी अमोलने कार भाड्याने घेतली आणि देवदर्शनाच्या बहाण्याने तो तिला घेऊन सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे गेला. तेथे पोहोचल्यानंतर त्याने मोटारचालकाला गाडी पार्किंगमध्ये लावण्यास सांगितले. त्यानंतर अमोल आणि ललिता दोघे चालत फिरायला निघाले. गप्पा मारता मारताच अमोलने दरीजवळ थांबलेल्या ललिताला धक्का दिला अन् ती खाली कोसळली. पण झाडाच्या फांदीला अडकल्याने ती बचावली, ती जिवंत असल्याते पाहून अमोलसिंग दरीत उतरला आणि त्याने तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला.

ती मरण पावल्याची खात्री केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह डोंगर उतारावरुन ढकलून दिला.आणि तो पसार झाला. यानंतर त्याने, ललिता बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. अखेर त्याचं बिंग फुटलं आणि खून केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी आरोपी अमोलसिंग जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.