Pune Porsche accident : 2 कार, 4 शहरं, नवीन सीम कार्ड, विशाल अग्रवालने अटक टाळण्यासाठी काय-काय केलं?

Pune Porsche accident : पुण्यात आलिशान पोर्शे कारने दुचाकीला उडवलं. अल्पवयीन आरोपी घटनेच्यावेळी दारुच्या नशेत होता. नियमानुसार पुणे पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना सुद्धा अटक केली. आरोपीचे वडील विशाल अग्रवालने अटक टाळण्यासाठी काय-काय केलं? कुठे-कुठे गेले? त्याची सर्व माहिती समोर आलीय.

Pune Porsche accident : 2 कार, 4 शहरं, नवीन सीम कार्ड, विशाल अग्रवालने अटक टाळण्यासाठी काय-काय केलं?
who is vishal agarwal father of pune porsche accident accused vedant net worth all you need to know
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 8:47 AM

पुण्यात एका अल्पवयीन आरोपीने रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीला उडवलं. यात निष्पाप तरुण-तरुणीला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. आरोपी एका बड्या बिल्डरचा मुलगा आहे. आरोपी अल्वयीन आहे. त्याच्याकडे गाडी चालवण्यासाठी परवाना सुद्धा नव्हता. शनिवारी मध्यरात्री पुण्याच्या रुंद रस्त्यावर आलिशान पोर्शे कार वेगाने पळवताना आरोपीने दुचाकीला उडवलं. आरोपी यावेळी मद्याच्या नशेत होता. पबमध्ये दारु पिऊन बाहेर पडला होता. या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. पेशाने तो रिअल इस्टेट डेव्हलपर आहे.

विशाल अग्रवालला मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अग्रवाल विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मुलाने केलेल्या गुन्ह्यात आपल्याला सुद्धा अटक होणार, याची जाणीव होताच आरोपी विशाल अग्रवाल पोलिसांना चकवा देत होता. अटक चुकवण्यासाठी विशाल अग्रवाल सर्वप्रथम पुण्यात दौंड येथे त्यांचं फार्महाऊस आहे, तिथे गेला. तिथून कोल्हापूरला गेला. तिथे एका मित्राला भेटला. कोल्हापूरवरुन त्याने, ड्रायव्हरला कारने मुंबईला पाठवलं. पोलिसांनी दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे केलं.

कुटुंबियांनाही फसवलं

त्यानंतर तो मित्राच्या कारमध्ये बसून छत्रपती संभाजीनगरला गेला. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून विशाल अग्रवालने कुटुंबियांना सुद्धा चुकीची माहिती दिली. आपण मुंबईला जात असल्याच त्याने सांगितलं.

त्याने मोबाइल बंद करुनही पोलिसांना कसं समजलं?

मोबाइलवरुन पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून विशाल अग्रवालने वापरात असलेला फोन बंद केला व नवीन नंबर घेतला. मित्राच्या कारमधील जीपीएसवरुन त्यांच्या सर्व हालचाली पोलिसांना समजत होत्या. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं. अग्रवालने त्याच्या कुटुंबाला पाठवलेल्या मेसेजची पडताळणी केली, त्यातून विशाल अग्रवाल संभाजीनगरच्या एका छोट्या लॉजमध्ये लपल्याच पोलिसांना समजलं. अखेर पोलिसांनी त्याला लॉजमधून अटक केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.