Pune Porsche accident : खरच ही शिक्षा का? बाल सुधारगृहात असा असेल आरोपीचा दिनक्रम

Pune Porsche accident : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात बाल हक्क न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला आहे. पण त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आता बाल सुधारगृहात वेदांत अग्रवालचा दिनक्रम कसा असणार? त्याची माहिती समोर आलीय.

Pune Porsche accident : खरच ही शिक्षा का? बाल सुधारगृहात असा असेल आरोपीचा दिनक्रम
pune car accident case
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 11:53 AM

पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून वेदांत अग्रवाल दोन जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय. शनिवारी मध्यरात्री त्याने त्याच्या आलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला उडवलं. या घटनेत निष्पाप तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. खरतर त्याने केलेला गुन्हा खूप मोठा आहे. बुधवारी बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. वेदांत अल्पवयीन आहे. त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यातील तरतुदींच्या आधारे काही लाभ मिळणार आहेत.

वेदांत अग्रवालचा बाल सुधारगृहात असा असणार दिनक्रम

– सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आवराआवर करून नाष्टा दिला जातो. नाष्ट्याला पोहे, उपीट, अंडी, दूध असतं.

– 11 वाजता प्रार्थना होते

– 11 ते 1 इंग्रजी आणि वेगवेगळ्या विषयाच्या शिकवण्या

– 1 ते 4 डॉर्मेटरीमध्ये आराम

– 4 वाजता पुन्हा नाष्टा

– 5 वाजेपर्यंत टीव्ही

– 5 ते 7 व्हॉलीबॅाल-फुटबॅाल खेळायला सुट्टी

– 7 नंतर जेवण

– 8 वाजता झोपण्यासाठी डॉर्मेटरीमध्ये रवानगी

जेवणासाठी सात्विक पौष्टिक आहाराचे मेन्यू. यात पालेभाज्या, चपाती, वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू असतात.

वेदांतवर प्रौढ म्हणून खटला कधी चालणार?

कायद्यानुसार, आरोपी प्रौढ आहे का, हे सिद्ध करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या केल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जातो. त्या चाचण्या करण्यासाठी कोर्टाला काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे आजच प्रौढ म्हणून कोणताही निकाल देता येणार नाही, अशी भूमिका बाल हक्क न्यायालयाने घेतली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.