Deep Sidhu | माझा डोळा लागला, इतक्यात गाडी दाणकन् ट्रकवर आदळली, दीप सिद्धूच्या NRI मैत्रिणीने सांगितला अपघाताचा थरार

हरियाणातील कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी दीप आणि रिना दिल्लीहून बठिंड्याला जात होते. दीप स्वतः गाडी चालवत होता.

Deep Sidhu | माझा डोळा लागला, इतक्यात गाडी दाणकन् ट्रकवर आदळली, दीप सिद्धूच्या NRI मैत्रिणीने सांगितला अपघाताचा थरार
अभिनेता दीप सिद्धू आणि मैत्रीण रिना राय
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:43 AM

चंदिगढ : पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा कार अपघातात (Car Accident) मृत्यू झाला. या अपघातावेळी नेमकं काय घडलं, याची माहिती दीपची सहप्रवासी आणि एनआरआय मैत्रीण रिना राय (Reena Rai) हिने दिली आहे. अपघाताच्या वेळी दीप सिद्धू स्वतः गाडी चालवत होता, तर त्याच्या शेजारी बसलेल्या रिनाचा नुकताच डोळा लागला होता. इतक्यात त्यांची स्कॉर्पियो कार ट्रकवर आदळली. त्यानंतर जवळपास 20 ते 30 मीटर अंतरापर्यंत गाडी फरफटत गेली. त्यामुळे कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. तर रिना जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांना तिने दिलेल्या जबाबात अपघाताची माहिती समोर आली. एअरबॅगमुळे रिनाचा जीव वाचल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

हरियाणातील कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी दीप आणि रिना दिल्लीहून बठिंड्याला जात होते. दीप स्वतः गाडी चालवत होता. खरखौदाजवळ स्कॉर्पिओ कारची ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की गाडी ट्रकमध्ये घुसून तिच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर दीपला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्याला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर रिना जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिची प्रकृती स्थिर आहे. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

धावत्या ट्रकवर मागून आदळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी 22 चाकी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा नव्हता, तर केएमपी एक्स्प्रेस वेवर धावत होता. तेव्हा मागून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ त्याला धडक दिली. अपघातानंतर रिना रायने तिच्या काही ओळखीच्या व्यक्तींना घटनास्थळी बोलावले. तेवढ्यात केएमपीवरील रुग्णवाहिका आणि इतर जण अपघात स्थळी पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपची एनआरआय मैत्रिण गेल्या महिन्यात 13 जानेवारीला अमेरिकेतून भारतात आली होती. दोघेही गुरुग्राममधील ओबेरॉय हॉटेलमध्ये थांबले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुरुग्राम सोडल्यानंतर त्यांनी बदली टोलवरुन केएमपीचा रस्ता धरला. ते केएमपीवर खरखोडाजवळ पोहोचले असताना हा अपघात झाला.

कोण होता दीप सिद्धू?

दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याचा जन्म 1984 मध्ये झाला होता. तो पंजाबी अभिनेता होता. दीप सिद्धूने कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाला. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

लोकसभा निवडणुकीत सनी देओलच्या प्रचाराला

सिद्धू अभिनय क्षेत्रासोबतच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही विख्यात होता. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या टीमने त्यांना स्वतःसोबत सहभागी करुन घेतले. जेणेकरुन तो स्थानिक लोकांना सनी देओल यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करु शकेल.

ट्रॅक्टर रॅलीला भडकवल्याचा आरोप

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू सोशल मीडियावर चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी फडकवलेल्या किसान युनियनच्या झेंड्याबद्दल आणि उफाळलेल्या हिंसेबद्दल दीप सिंह सिद्धूला जबाबदार ठरवले जात होते.

दीप सिद्धूच्या अपघातग्रस्त कारचा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

Deep Sidhu Accident VIDEO | ज्या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा अंत झाला, त्या गाडीची अवस्था दाखवणारा व्हिडीओ पाहा

दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू; किसान आंदोलनामुळे आला होता चर्चेत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.