Raigad Crime News : मोठा भाऊ बुडतोय म्हणून छोट्या भावाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी…
mahad dahiwad news : अधिक पाण्यात कुणीही उतरु नका असं पोलिस प्रशासनानं अनेकदा जाहीर केलं आहे. परंतु कसलीही भीती न बाळगता केलेली डेरिंग अंगलट आल्याचं अनेकदा पाहायला मिळत आहे.
महाड : काल एक दुर्देवी घटना घडली (mahad dahiwad news) आहे. ज्यांनी ही घटना पाहिली त्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या डोळ्यादेखत एकाचा मृत्यू बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रायगड (Raigad Crime News) जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळण खुर्द येथील घावर कोडं धबधब्यावर (Walan khurd ghavar kod waterfall) काल दुपारी एकाचा बुडून मृत्यू झाला. मोठा भाऊ पाण्यात बुडत असल्यामुळे त्याला छोटा वाचवण्यासाठी गेला होता अशी माहिती तिथल्या पर्यटकांनी पोलिसांना सांगितली आहे. धबधब्याचा डोह मोठा असल्यामुळे मृत्यू झाल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.
नेमकं काय झालं
सोमवारी दुपारी ६ तरुण वाळण खुर्द येथील घावर कोडं धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी काहीजण तिथल्या जवळच्या पाण्यात पोहण्यसाठी उतरले. धबधब्याखाली मोठा डोह असल्यामुळे तिथं पाण्याचा अंदाज येत नाही. त्यावेळी तिथं एकजण पाण्यात बुडत असल्याने आरडाओरड सुरु झाली. त्यावेळी मोठ्या भावाला वाचवण्यासाठी छोट्या भावाने पाण्यात उडी घेतली. परंतु छोट्या भावाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मोठा भाऊ बुडत असल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या छोट्या भावाचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. वीस वर्षीय तरुणाचा धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. स्मित राजेंद्र घाडगे असं मृत्यू तरुणाचं नाव आहे. या तरुणांचा एक सहा जणांचा ग्रुप त्या धबधब्यावर गेला होता. त्या ग्रुपमधील अनेकांना धक्का बसला आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.