Raigad Bomb Scare | उरणच्या समुद्र किनारी स्फोटक सदृश्य वस्तू, माणकेश्वर बीचवर खळबळ

नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दहा ते बारा स्फोटक कांड्या सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. माणकेश्वर समुद्र किनारी ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Raigad Bomb Scare | उरणच्या समुद्र किनारी स्फोटक सदृश्य वस्तू, माणकेश्वर बीचवर खळबळ
रायगडमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळलीImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 1:56 PM

रायगड : उरणमधील समुद्र किनारी (Uran Beach) स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याची घटना ताजी असतानाच रायगडमध्येही (Raigad Crime) असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. माणकेश्वर बीचवर (Manakeshwar) स्फोटक सदृश्य वस्तू सापडली आहे.  दहा ते बारा स्फोटक कांड्या सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर मोरा पोलीस, एसीपी कार्यालय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. माणकेश्वर समुद्र किनारी ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये माणकेश्वर बीचवर स्फोटक सदृश्य वस्तू आढळली आहे. माणकेश्वर किनारी या वस्तू सापडल्या आहेत.  दहा ते बारा स्फोटक कांड्या सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून मोरा पोलीस, एसीपी कार्यालयातील कर्मचारीही माणकेश्वर बीचवर दाखल झाले आहेत. त्यामुळे तूर्तास माणकेश्वर समुद्र किनारी पर्यटक-ग्रामस्थांसह कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नागपुरातही जिवंत स्फोटकांची बॅग

याआधी, नऊ मे (सोमवारी) रात्री गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात जिवंत स्फोटकांची बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे. जिलेटिनच्या 54 कांड्या असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.