लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी समोर आला बायकोचा भूतकाळ! नवरा थेट पोलिसांत गेला आणि…

लग्न करुन जिच्यासोबत भविष्याची स्वप्न पाहिली होती, तिचा भूतकाळ ऐकून पती हादरला! नेमकं काय प्रकरण?

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी समोर आला बायकोचा भूतकाळ! नवरा थेट पोलिसांत गेला आणि...
लग्नाच्या तिसऱ्या दिवशी असं नेमकं काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 11:01 AM

राजस्थान : जयपूरमध्ये एक अजबच प्रकार समोर आलाय. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी बायकोचा भूतकाळ एका नवऱ्याला कळला. लग्नाआधी तब्बल 7 वर्ष आपल्या बायकोचे दुसऱ्याच तरुणाशी संबंध होते, हे पतीला कळलं. त्यानंतर पती थेट पोलीस स्थानकात गेला. पण पोलीस स्थानकात जाण्याआधी पतीला बायकोच्या प्रियकराने धमकावलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. ‘तुझी बायको माझी प्रेयसी आहे, तिला माझ्याकडे पाठवून दे’, अशी धमकी पतीला देण्यात आली होती. अखेर पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागूत पती मुरलीपुरा येथील पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार नोंदवली.

पोलिसांनी पीडित पतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मुरलीपुरा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पतीने आपल्या पत्नीविरोधातच गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

7 डिसेंबर रोजी तक्रारदार युवकाचं लग्न झालं होतं. पण लग्नाच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीने आपला भूतकाळ पतीला सांगितला. माझे गेल्या सात वर्षांपासून एका मुलासोबत प्रेमसंबंध आहे, असं पत्नीने पतीला सांगितलं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीचा भूतकाळ ऐकून पती हादरुनच गेला.

दरम्यान, याचवेळी पत्नीचा प्रियकर असलेला गगन नावाच्या मुलाने मला फोन केला आणि त्याने मला धमकीही दिली, असा आरोप तक्रारदार पतीने केलाय. तू जर तिला माझ्याजवळ पाठवलं नाही, तर मी तुझा जीव घेईन, अशी धमकी तक्रारदार तरुणाला देण्यात आली होती.

इतकंच नाही तर पत्नीचा प्रियकर आमच्या घरी आला आणि त्याने माझ्या आईलाही धमकावलं, असही तक्रारीत म्हटलंय. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेन, अशी धमकी देऊन गगन गेला असल्याचं पतीने पोलिसांना म्हटलंय. दुसरीकडे तक्रारदार पतीच्या पत्नीने तिच्या वडिलांना गगनवर आपलं प्रेम असल्याची कबुलीही दिल्याची माहिती समोर आलीय.

या संपूर्ण प्रकराला तक्रारदार तरुणाचे सासरे जबाबदार असल्याचंही बोललं जातंय. मुलीने आपल्या वडिलांना गगनसोबत असलेल्या प्रेमसंबंधांबाबत आधीच सांगितलं होतं. पण वडिलांनी तिचं जबरदस्ती दुसऱ्याच मुलाशी लग्न लावून दिलं. तक्रारदार पतीने पोलिसांत जाऊन मांडलेली भूमिकाही चर्चेत आली आहे. जर तिला आपल्या प्रियकरासोबत राहायचं असेल, तर ती जाऊ शकते, असं तक्रारदार पतीने पोलिसांना सांगितलंय. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.