लग्न सोहळ्यापूर्वी राडा, गोळीबारात वधूच्या काकांचा मृत्यू, वऱ्हाडींनी बुकलून आरोपीचाही जीव घेतला

वधू पक्षाच्या लोकांना धमकावत विजेंदर सिंगने गोळीबार सुरू केला. यापैकी एक गोळी सुरेश लोढा यांना लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी काकांना जिल्हा आरबीएम रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लग्न सोहळ्यापूर्वी राडा, गोळीबारात वधूच्या काकांचा मृत्यू, वऱ्हाडींनी बुकलून आरोपीचाही जीव घेतला
लग्न समारंभात दोन हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 11:56 AM

जयपूर : राजस्थानच्या (Rajasthan Crime News) भरतपूरमध्ये लग्न समारंभात (Wedding Ceremony Murder) बाईकच्या वेगावरुन गोंधळ उडाला. भरधाव वेगात मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला आधी काही लोकांनी कानफटात लगावली. याच्या विरोधात तरुणाच्या कुटुंबीयांनी गोळीबार (Firing) केला. ही गोळी थेट वधूच्या काकांना लागली. यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाचा बेदम मारहाण करुन जीव घेतला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

काय आहे प्रकरण?

अमरसिंह यांच्या मुलीची वरात कुम्हेर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबैन गावात येणार होती. आनंदाच्या वातावरणात संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत मग्न होते. त्यानंतर गावातील उपसरपंच ललिता देवी यांचा मुलगा सुमित राजपूत हा बाईकवरुन भरधाव वेगाने तिथे फिरत होता. त्यामुळे लग्नाच्या तयारीत अडचणी येऊ लागल्या. वधूचे काका सुरेश लोढा यांनी सुमितला बाईक चालवण्यापासून रोखले.

यावरुन दोघांमध्ये वाद झाला. प्रकरण इतके वाढले की सुरेश लोढा यांनी सुमितच्या कानशिलात लगावली. ही बाब सुमितचे वडील विजेंदर सिंग यांना कळताच ते संतापले आणि त्यांनी काही साथीदारांसह बंदूक घेऊन घटनास्थळ गाठले.

हे सुद्धा वाचा

तरुणाच्या वडिलांचा गोळीबार

वधू पक्षाच्या लोकांना धमकावत विजेंदर सिंगने गोळीबार सुरू केला. यापैकी एक गोळी सुरेश लोढा यांना लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी काकांना जिल्हा आरबीएम रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तरुणाची काठ्यांनी मारुन हत्या

दुसरीकडे या घटनेने संतप्त झालेल्या सुरेशच्या कुटुंबीयांनीही विजेंद्रला पकडून काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्याचे नातेवाईकही त्याला रुग्णालयात घेऊन गेले, तिथे त्यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, गावात दोन पक्षांमध्ये गोळीबार झाला होता. ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एका सदस्याचा मृत्यू झाला. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर कडेकोट बंदोबस्तात शहरातील मॅरेज होममध्ये रात्री उशिरा तरुणीचा विवाह पार पडला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.