तीन मुलींसोबत आईने स्वत:लाही संपवलं, दोघी बचावल्या, रेल्वेखाली येण्याचं नेमकं कारण काय ?

पोटच्या पाच मुंलीना घेऊन एका आईने रेल्वेसमोर उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील दौसा येथे घडली (rajasthan dausa mother five girls railway suicide)

तीन मुलींसोबत आईने स्वत:लाही संपवलं, दोघी बचावल्या, रेल्वेखाली येण्याचं नेमकं कारण काय ?
SUICIDE
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 3:56 PM

जयपूर : पोटच्या पाच मुलींना घेऊन एका आईने रेल्वेसमोर उडी घेत सामूहिक आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील दौसा येथे घडली. या घटनेमुळे दौसा येथे एकच खळबळ उडाली असून या आत्महत्याचे नेमके कारण काय ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रेल्वेसमोर येऊन आत्महत्या करणाऱ्या आईला एकूण पाच मुली होत्या. यातील तीन मुलींचा मृत्यू झाला. तर बाकीच्या दोन मुलींनी ऐन वेळी आईपासून स्वत:ची सुटका करुन घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. आपल्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव विनीता असे आहे. (Rajasthan Dausa mother with Five girls suicide jumped in front of railway)

तीन मुलींचा मृत्यू, दोघी बचावल्या

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील दौसा येथे एका महिलेने आपल्या पाच मुलींना सोबत घेऊन रेल्वेसमोर येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात महिलेच्या पाच पैकी दोन मुली बचावल्या आहेत. तर तीन मुलींना आपल्या आईसोबतच प्राण गमवावे लागले. ही घटना दौसा येथील मंडावर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली.

आत्महत्येचं नेमकं कारण काय ?

घडलेला हा प्रकार दौसा येथील मंडावर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या आईचे नाव विनिता असून तिचे वय 34 आहे. ही महिला मूळची बावडीखेडा गावातील रहिवसी असून तिचा नवरा हा रेल्वेखात्यात गेटमॅन म्हणून नोकरीला होता. मात्र, या महिलेच्या नवऱ्याला दारू पिण्याची सवय असल्यामुळे त्यांच्या घरात नेहमी कलह व्हायचा. याच कलहापोटी आणि कौटुंबिक वादातून या महिलेने आपल्या तीन मुलींना घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जातोय. महिलेसोबत मृत्यू झालेल्या मुलींची नावे कोमल (10), अमनी (8), पायल (2) अशी आहेत. तर ऐनवेळी आईच्या तावडीतून सुटून स्वत:चे प्राण वाचवण्यात परी आणि कोयल यशस्वी ठरल्या.

ट्रेन समोर दिसताच रुळावर उडी

विनीता या महिलेचा पती दारुच्या पूर्णपणे आहारी गेलेला होता. याच कारणामुळे विनीता आणि त्यांच्या पतीमध्ये कलह होत असे. सोमवारी (10 मे) अशाच प्रकारे या दोघांमध्ये वाद झाले होते. मात्र, यावेळी राग अनावर झाल्यामुळे या महिलेने आपल्या पाचही मुलींना सोबत घेऊन स्वत:ला संपवण्याचे ठरवले. त्यानंतर या महिलेने आपल्या पाचही मुलींना घेऊन थेट रेल्वेरुळाकडे धाव घेतली. आग्रा ते बांदीकुई असा प्रवास करणाऱी रेल्वे दिसताच या महिलेने आपल्या मुलींसोबत थेट उडी घेतली. मात्र, यावेळी तिच्या पाच मुलींपैकी दोन मुलींनी आईपासून सुटका करवून घेतली आणि यशस्वीपणे आपले प्राण वाचवले. पण यामध्ये थेट रेल्वेखाली आल्यामुळे विनीता आणि त्यांच्या तिन्ही मुलींचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर आपले प्राण वाचवलेल्या दोन्ही मुलींनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. हा आवाज ऐकूण लोकांनी तसेच प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, थेट रेल्वेखाली आल्यामुळे यापैकी एकाचाही प्राण वाचवण्यात यश आले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

पहिल्या पत्नीपासून एक मुलगा, दुसऱ्या पत्नीसोबतही वाद, मध्यरात्री हत्या करुन पोलीस ठाण्यात दाखल, आरोपी पतीने असं का केलं?

निर्लज्जपणाचा कळस! अखेरच्या घटका मोजणाऱ्या नवऱ्यासमोरच महिलेचा कम्पाऊण्डरकडून विनयभंग

छोट्या भावाला पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, थेट केली हत्या

(Rajasthan Dausa mother with Five girls suicide jumped in front of railway)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.