योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा धक्का! पतंजली समुहाच्या ‘या’ 5 औषधांवर बंदी

पंतजली समूहाची ही 5 औषधं वापरत असाल तर सावधान! जाणून घ्या, का घालण्यात आली बंदी?

योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा धक्का! पतंजली समुहाच्या 'या' 5 औषधांवर बंदी
मोठी कारवाई...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 7:51 AM

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली समुहाच्या (Patanjali) पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. उत्तराखंडमधील (Uttarakhand) आर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्या औषधांवर बंदी?

पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.

मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या औषधांच्या उत्पादनसोबतच या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्यास सांगण्यात आलं.

पाहा व्हिडीओ :

केरळचे डॉक्टर के व्ही बाबू यांनी पतंजलीच्या औषधांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता.

दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचं उत्पादन केलं होत होतं. या औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या औषधांचं पुन्हा उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, या आदेशाची प्रत आपल्याला मिळाली नसल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटल्याच्याही काही बातम्या समोर आल्या आहेत. ही कारवाई चुकीची असल्याची आणि आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आता आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीने करण्यात आलाय.

याआधीही अनेकदा पतंजलीचे वेगवेगळे प्रॉडक्ट चर्चेत आले होते. आता करण्यात आलेल्या कारवाईमुळे पतंजली समुहाला आर्थिक फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. दरम्यान, तुम्हीही जर ही औषधं वापरत असाल, तर त्याचा वापर थांबवावा, असंही आवाहन जाणकारांनी केलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.