AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri Accident : बापरे! टेम्पोवर ट्रक उलटून रत्नागिरीतील भाट्येमध्ये भीषण अपघात! 1 ठार, दोघे जखमी

Ratnagiri Accident : चालक टेम्पोत अडकून पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. हा टेम्पो रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने सिकंदर गावखडकर छोटा हत्ती टेम्पो घेऊन जात होता. त्यांच्यासोबत गालिफ पांढरे आणि प्रजाली प्रताप पेटकर असे अन्य दोघेजणही सोबत होते. पण ते थोडक्यात बचावले आहे.

Ratnagiri Accident : बापरे! टेम्पोवर ट्रक उलटून रत्नागिरीतील भाट्येमध्ये भीषण अपघात! 1 ठार, दोघे जखमी
रत्नागिरीत भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 8:41 AM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri News) शहरालगतच्या भाट्ये झरी विनायक मंदिराच्या समोरील रस्त्यावर भीषण अपघात (Ratnagiri Accident) झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती या दोन वाहनांचा अपघात झाला असून या अपघाताची भीषणता इतकी होती की छोटा हत्ती हा ट्रक खाली पूर्णपणे चेपला गेला. मालवाहू ट्रक पावसहून (Pavas, Ratnagiri) रत्नागिरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी रत्नागिरीवरुन पावसच्या दिशेने येणाऱ्या छोटा हत्तीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत छोटा हत्ती मधील 2 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. भीषण अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर गालिफ पांढरे (45, पूर्णगड) व प्रजाली प्रताप पेटकर (पूर्णगड) अशी जखमींची नावे आहेत. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. पण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य केलं. त्यामुळे सुदैवानं थोडक्यात दोघे बचावलेत.

तीव्र वळणावर अपघात

पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक एका तीव्र वळणावर उलटला. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो थेट छोटा हत्ती असलेल्या टेम्पोवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, यात टेम्पोचा चक्काचूर झाला. तर टेम्पो चालक टेम्पोत अडकून पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. हा टेम्पो रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने सिकंदर गावखडकर छोटा हत्ती टेम्पो घेऊन जात होता. त्यांच्यासोबत गालिफ पांढरे आणि प्रजाली प्रताप पेटकर असे अन्य दोघेजणही सोबत होते. पण ते थोडक्यात बचावले आहे. मात्र त्यांनाही गंभीर जखम अपघातामध्ये झाली.

स्थानिकांचं प्रसंगावधान

दरम्यान, जीजे 16 एयू 5415 नंबरचा ट्रक हा फिनोलक्स कंपनीतून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. एका तीव्र वळणावर ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि ज्याची भीती होती तेच झालं. ट्रक तर उलटलाच पण तो थेट दुसऱ्या एका टेम्पोवरच पलटी झाला. त्यामुळे टेम्पोमधील तिघे जण आतमध्ये अडकले गेले. तर वेळीच स्थानिकांनी बचावकार्य करण्यास सुरुवात केली म्हणून इतर दोघांचा किमान जीव वाचलाय. या अपघातानंतर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूकही पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. तसंच अपघातग्रस्त वाहनंही हटवण्यात आली.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.