Nuh violence | गाड्या पेटवल्या, घरं-दुकान जाळण्याचा प्रयत्न, कलम 144 लागू, नूंहमध्ये कशामुळे भडकला हिंसाचार?

Nuh violence | प्रक्षोभक जमावाने गाड्यावर दगडफेक केली. राज्य सरकारने आता मेवात, गुरुग्राम, फरीदाबाद आणि रेवाडीमध्ये कलम 144 लागू केलय. लोकांना शांतता राखण्याच आवाहन करण्यात येतय.

Nuh violence | गाड्या पेटवल्या, घरं-दुकान जाळण्याचा प्रयत्न, कलम 144 लागू, नूंहमध्ये कशामुळे भडकला हिंसाचार?
Nuh violenceImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 9:20 AM

नूंह : हरियाणाच्या नूंहमध्ये सोमवारी एका धार्मिक यात्रेदरम्यान हिंसाचार भडकला. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. नूंहमध्ये हिंसाचारादरम्यान दोन होमगार्ड आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. नूंहमधील हिंसाचाराची आग आसपासच्या भागात पसरली. चार जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राकडून अतिरिक्त सुरक्षा पथक पाठवण्यात आली आहेत. आज मंगळवारी काही भागात शाळा-कॉलेजेस बंद आहेत. हा हिंसाचार कसा परसरला, त्या बद्दल अपडेट जाणून घ्या.

हरियाणाच्या नूंहमध्ये सोमवारी विश्व हिंदू परिषदेकडून बृज मंडल जलभिषेक यात्रा काढली होती. या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे आले होते. नूंहमधूनच वादाला सुरुवात झाली. भाजपा जिल्हाध्यक्ष गार्गी कक्कड़ यांनी गुरुग्रामच्या सिविल लाइंस भागातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

एका सुमदायाच्या लोकांचा विरोध

या यात्रेत मोनू मानेसर सहभागी होणार अशी बातमी आली. नासिर-जुनैद हत्या प्रकरणात तो फरार आहे. त्यानंतर नूंहमध्ये एका सुमदायाच्या लोकांनी विरोध सुरु केला. दगडफेक केली. दोन्ही बाजूच्या गटांकडून दगडफेक सुरु झाली.

विश्व हिन्दू परिषदेची यात्रा

दुपारी सुरु झालेल्या या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. 15 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. जखमी पोलिसींवर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विश्व हिन्दू परिषदेची यात्रा रोखण्यासाठी जमावाने दगडफेक केली. त्यावरुन मोठा राडा झाला. गाडया पेटवण्यात आल्या. दुकान, घर जाळण्याचा प्रयत्न झाला. नूंहमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर केंद्राकडून अतिरिक्त सुरक्षा पथक पाठवण्यात आली.

कुठल्या जिल्ह्यात कलम 144 लागू ?

नूंहला लागून असलेल्या सोहना भागातही राडा झाला. तिथे प्रक्षोभक जमावाने गाड्यावर दगडफेक केली. राज्य सरकारने आता मेवात, गुरुग्राम, फरीदाबाद आणि रेवाडीमध्ये कलम 144 लागू केलय. लोकांना शांतता राखण्याच आवाहन करण्यात येतय. इंटरनेट सेवा बंद

दोन गटांमध्ये झालेला जोरदार हिंसाचार आणि राड्यानंतर आता सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. नूंह आणि फरीदाबादमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय फरीदाबादमध्ये एक ऑगस्टला सर्व सरकारी, प्रायवेट शाळा बंद आहे. गुरुग्राम-पलवलमध्ये सुद्धा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.