CCTV VIDEO: दिवसा रेकी आणि रात्री घरफोडी; दरवाजा तोडून साडे पाच लाखाचे दागिने लंपास

ज्या दिवशी ते घरी आले त्यादिवशी त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यानी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला.

CCTV VIDEO: दिवसा रेकी आणि रात्री घरफोडी; दरवाजा तोडून साडे पाच लाखाचे दागिने लंपास
दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळी दरवाजा तोडून सोने लंपास
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:36 PM

मुंबईः दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळेस घरफोडी (Robbery) करणाऱ्याला मालवणी पोलिसांनी (Malwani Police) अटक केली आहे. अब्दुल रज्जाक मुनाफ अन्सारी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 5 लाख 51 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या चोरीबद्दल ज्यांनी तक्रार केली आहे, ते तक्रारदार हे मालवणी परिसरात राहतात. गेल्या महिन्यात ते कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी गुजरात येथे गेले होते. तेव्हा अब्दुलने घरफोडी करून 5 लाख 71 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता.

ज्या दिवशी ते घरी आले त्यादिवशी त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यानी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला. घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याची तक्रार केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हसन मुलांनी, मोरे, शिंदे, भंडारे, वत्रे, खांडवी, आमटे आदी पथकाने तपास सूर केला.

सीसीटीव्हीचा धागा पकडून चोराकडे

या प्रकरणाचा तपास चालू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. एका फुटेजमध्ये अब्दुल जात असताना दिसत आहे. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरु केला. तपास सुरु केल्यानंतर या चोरीप्रकरणी पोलिसांनी अब्दुलला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने घरफोडी केल्याची कबुल केले.

अब्दुल हा रेकॉर्डवरचा आरोपी

अब्दुलने घरफोडीसाठी लागणारे साहित्य घरासमोरील बागेतील गवतात तर चोरीचे सोने घरात लपवून ठेवले होते. त्याच्याकडून घरफोडीसाठी लागणारी कटावणी आणि चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. अब्दुल हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. या तपासानंतर त्याने आणखी कुठे चोरी केली आहे का, याचाही तपास घेतला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Pune crime : अट्टल मोबाइल चोरट्यांसह विकत घेणारेही जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Photo Gallery | एसटी आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसचा भीषण अपघात ; 55 प्रवाशी जखमी

Raigad Accident | एसटी आणि JSW च्या बसची समोरासमोर भीषण धडक, 55 प्रवासी जखमी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.