रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत, मुंबईसह नागपूर पोलिसांची कडक कारवाई

या ठिकाणी इंजेक्शनच्या नावे दुसरेच इंजेक्शन रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना देत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. (Remdesivir Injection Black Marketing)

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत, मुंबईसह नागपूर पोलिसांची कडक कारवाई
shortage corona drug remedicivir
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 4:38 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत होता. तसेच दुसरीकडे या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील चेंबूर भागातील एका महिलेने ऑनलाईन रेमडेसिव्हीर मागवले असता तिला दुसरेच इंजेक्शन देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. (Remdesivir Injection Black Marketing Mumbai nagpur police take action)

मुंबईतही एकाला अटक 

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. तर या ठिकाणी इंजेक्शनच्या नावे दुसरेच इंजेक्शन रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना देत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. मुंबईतील चेंबूरमधील टिळकनगर भागात राहणाऱ्या एका महिलेला रेमडेसिव्हीरची गरज होती. एका ऑनलाईन वेबसाईटवर रेमडेसिव्हीर उपलब्ध असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर तिने त्या इंजेक्शनची ऑर्डर दिल्यानंतर 18 हजार रुपये दिले. मात्र तिला दुसरेच इंजेक्शन देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

यानंतर त्या महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी याबाबतचा वेगाने तपास करून 24 तासात आरोपी रुपेश गुप्ता याला पालघरच्या वाळीव येथून अटक केली. या आरोपीने याआधी दादर, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या ठिकाणी 7 जणांना तब्बल 29 इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात दोन नर्सच्या पतींना अटक

तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात नकली रेमडेसिव्हीरचा काळाबाजारप्रकरणी कारवाई सुरु आहे. या प्रकरणी एका रुग्णालयातील दोन नर्सच्या पतींना अटक करण्यात आली आहे. नागपुरात गेल्या 15 दिवसांपासून हा गोरखधंदा सुरु आहे. या रॅकेटमधील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नागपुरातील हे आरोपी गरजू ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांना अव्वाच्या सव्वा दराने रेमडेसिव्हीर विकत होते. नागपुरातील सक्करदरा पोलिसांनी या रॅकेटमधील एका आरोपीला 28 हजार रुपयांत इंजेक्शन विकताना रंगेहाथ पकडले आहे. तसेच आणखी काही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.  (Remdesivir Injection Black Marketing Mumbai nagpur police take action)

संंबंधित बातम्या : 

Video: नंदुरबारच्या खासदार म्हणतात, जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला !

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून, वाशिमच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

ऑक्सिजन मास्क फेकून देत कोरोनाग्रस्ताचे पलायन, रुग्ण अजूनही बेपत्ता; नागपुरातील धक्कादायक प्रकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.