AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; 85 इंजेक्शन जप्त, 9 जणांना अटक

नाशिक पोलिसांनी रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या 9 जणांना मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 85 रेमडेसिव्हीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आले आहेत.

'रेमडेसिव्हीर'चा काळाबाजार, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; 85 इंजेक्शन जप्त, 9 जणांना अटक
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला नाशिक पोलीसांकडून अटक
| Updated on: May 19, 2021 | 4:01 PM
Share

नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही पाहायला मिळतोय. साधारण दीड हजार रुपयांच्या आत किंमत असलेले हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंतही विकलं जात आहे. नाशिक पोलिसांनी रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या 9 जणांना मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 85 रेमडेसिव्हीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिलीय. (Nashik police arrests 9 accused involved in black marketing of remedesivir )

नाशिकमध्येच काही दिवसांपूर्वी 3 महिला आणि एका तरुणाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या दराने विकताना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मंगळवारी या टोळीतील मुख्या सूत्रधार सिद्धेश पाटील याला अटक करुन त्याच्याकडून 63 रेमडेसिव्हीर इंजेक्शन हस्तगत करण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय. राज्यातील आतापर्यंतचही ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालय परिसरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. या परिसरात पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या तिनही महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. या आरोपींकडून पोलिसांनी 2 रेमडेसिव्हीर इंजेक्शन ताब्यात घेतले होते.

सखोल चौकशीनंतर प्रकरणाची व्याप्ती वाढली

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या या टोळीत अजून काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीला पोलिसांनी सुरुवात केली. चौकशीचे चक्र फिरल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 85 इंजेक्शन हस्तगत केले आहेत.

Nashik Police

आडगाव पोलीस ठाणे

फार्मा कंपनीतील मुख्य आरोपीलाही बेड्या

या टोळीतील मुख्य आरोपी सिद्धेश पाटील हा पालघरमध्ये असलेल्या एका फार्मा कंपनीत काम करत होता. त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून 63 इंजेक्शन्स पोलिसांनी हस्तगत केलेत. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना तासंनतास रांगेत उभं राहावं लागत होतं. तर दुसरीकडे संकटाच्याकाळात इंजेक्शनचा काळाबाजार करत लाखो रुपयांची कमाई हे आरोपी करत होते. दरम्यान नाशिकच्या आडगाव पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : हजार नाही, इथे दोन हजाराचाच रेट, तेवढे पैसे दे, तुझी गाडी सोडतो, पोलिसाची ट्रक ड्रायव्हरकडून लाच, व्हिडीओ व्हायरल

इन्स्टाग्रामवर मैत्री, फोटो मॉर्फ करुन तरुणीला ब्लॅकमेल, 21 वर्षीय आरोपीला बेड्या

Nashik police arrests 9 accused involved in black marketing of remedesivir

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.