‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…
रिपलिंग कंपनीचा संस्थापक प्रसन्न शंकरने पत्नीचे अफेअर असल्याचे सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत उघड केले आहे. तसेच पत्नी पोलिसांच्या मदतीने छळ करत असल्याचा देखील आरोप केला आहे.

रिपलिंग कंपनीचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्याने पत्नीवर मुलाचे अपहरण केल्याचा तसेच मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. प्रसन्नने सोशल मीडियावर पत्नीचे अफेअर असल्याचे सांगत तिच्या प्रियकरासोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट केले आहेत. हे पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
पोलिसांसोबत मिळून त्रास दिला




प्रसन्न शंकरने सोशल मीडिया अकाऊंटवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने त्याच्यासोबत नेमकं काय झालं हे सांगितलं आहे. प्रसन्नने आपल्या पत्नीवर चेन्नई पोलिसांच्या मदतीने छळ केल्याचा आरोप केला आहे. त्याने एका पोस्टमध्ये सांगितले की तो आपल्या पत्नीपासून वेगळा राहत आहे आणि आता त्याची पत्नी घटस्फोटासाठी मोठ्या रकमेची मागणी करत आहे.
वाचा: हनीमूनहून येत होते, अचानक डॉक्टरांना बोलावलं, सांगणही अवघड जातंय; काय घडलं?
१० वर्षांपूर्वी केले होते लग्न
प्रसन्न शंकर आणि दिव्या शशिधर यांची भेट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली (NIT त्रिची) येथे झाली. त्यांचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना 9 वर्षांचा मुलगा आहे. प्रसन्नचा मुलगा पत्नीकडे आहे. पण दोघांमध्येही यावरून वाद सुरु आहे.
Anoop’s wife sent me the message my wife had sent Anoop and hotel bookings she made for him. pic.twitter.com/0gs1mMBc6d
— Prasanna S (@myprasanna) March 23, 2025
पत्नीचे अफेअर
प्रसन्न शंकरने सांगितले की, त्याची पत्नी आपली फसवणूक करत असून ती अनुप नावाच्या व्यक्तीसोबत ६ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. अनूपच्या पत्नीकडून या अफेअरची माहिती मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. अनूपच्या पत्नीनेच त्यांच्यातील संभाषणाचे पुरावे पाठवले होते असे प्रसन्नने सांगितले आहे. प्रसन्नने हे पुरावे थेट सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये प्रसन्नची पत्नी बॉयफ्रेंडला एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याला सोबत एक्स एल काँडम घेऊन येण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. प्रसन्नच्या पत्नीचे हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पत्नीने केली खोटी तक्रार
प्रसन्नने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्यानंतर आम्ही आमच्या घटस्फोटाच्या रकमेसाठी तिला किती रक्कम द्यावी लागेल या अटींवर वाटाघाटी करत होतो. ती यावर आनंदी नव्हती. तिने माझ्याविरुद्ध मारहाण केल्याची खोटी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिने आणखी खोट्या तक्रारी केल्या की मी तिच्यावर बलात्कार केला, तिचे नग्न व्हिडिओ प्रसारित केले. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आहे, ते निराधार असल्याचे आढळले आहे आणि मला सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे.”