AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ध्यात बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार, साडे तीन किलो सोनं लुटलं ! काय काय घडलं ?, पाहा व्हिडीओ

वर्ध्यातील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दिवसाढवळ्या दरोडा पडला आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

वर्ध्यात बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार, साडे तीन किलो सोनं लुटलं ! काय काय घडलं ?, पाहा व्हिडीओ
| Updated on: Dec 17, 2020 | 12:01 PM
Share

वर्धा: वर्ध्यातील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोने तारण कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनी दरोडा टाकला. ही घटना सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून त्यांच्याकडून तपास करण्यात येत आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

रोख रक्कम, सोने आणि दुचाकी चोरीला

बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर मुथुट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोहोचले. दरोडेखोरांनी कार्यालयातील 3 लाख 18 हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडे तीन किलो सोने नेले लुटून नेले. त्यांनी मुथूट फिनकॉर्पच्या एका कर्मचाऱ्याची दुचाकीदेखील चोरुन नेली आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

वर्धा शहरात खळबळ

सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याने वर्धा शहरात खळबळ माजली आहे. लाखो रुपयांचा दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले आहेत. मुथूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापनाला गुंगारा देत दरोडेखोरांनी सोने, रोख रक्कम लुटून नेली. मुथुट फिनकॉर्पच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या चेंबर पेटीतून रक्कम लंपास करण्यात आली. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

दरोडेखोरांचे कृत्य  सीसीटीव्हीत कैद

दरोडेखोरांनी चोरी करताना मास्क घातले होते. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपासाला सुरुवात झाली आहे. मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोलिसांनी फिंगर प्रिंट आणि स्केच तयार करण्याचं काम सुरु केलं आहे. पोलिसांनी मुथूटच्या कर्मचाऱ्यांकडून घडेलेल्या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

दरम्यान, वर्धा शहरात दिवसाढवळ्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा पडल्याने शहरात खळबळ पसरली आहे.

संबंधित बातम्या:

पिंपरीत क्रूरतेचा कळस, कुत्र्याला इमारतीवरुन फेकून ठार मारलं

नागपुरात माजी सैनिकाच्या घरी दरोडा, रोख रकमेसह पिस्टल लंपास केल्यानं खळबळ

(Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.