कर्जाची रक्कम 3.50 लाख, वसुल केले ‘इतके’; सावकारी कर्जाचा विळखा सुटता सुटेना !

एका व्यक्तीने खाजगी सावकाराकडून साडे तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्ज वसुली करताना व्याज आणि दंडासह आरोपींनी वसुल केलेली रक्कम पहाल तर तुम्हीही हैराण व्हाल.

कर्जाची रक्कम 3.50 लाख, वसुल केले 'इतके'; सावकारी कर्जाचा विळखा सुटता सुटेना !
सावकारी कर्जवसुलीचे धक्कादायक प्रकरण उघडकीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 9:55 AM

पुणे : भोर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सावकारी कर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साडेतीन लाख रुपये कर्जाची वसुली रक्कम ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साडे तीन लाखाच्या बदल्यात आरोपींनी व्याज आणी दंडासहित 41 लाख रुपये वसुल केले आहेत. याप्रकरणी पुण्याच्या भोरमधील खेडशिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल रोकडे आणि गणेश रोकडे अशी दोघा आरोपींची नावे आहेत. याबाबत मंगेश उत्तम घोलप या नागरिकाने फिर्याद दिली होती. राजगड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

साडेतीन वर्षाचे व्याज पाहून तुम्हीही थक्क व्हाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील रोकडे याने फिर्यादी मंगेश घोलप यांना सप्टेंबर 2019 मध्ये 3 लाख 50 हजार रूपये व्याजाने कर्ज दिले होते. मोबदल्यात आरोपींनी फिर्यादीला शिवापूर वाड्यावरील मटणशॉप हे आपले पैसे दिल्याशिवाय उघडायचे नाही, असे म्हणून जातीवाचक बोलून, शिवीगाळ दमदाटी करून पिस्टलने जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीकडून आतापर्यंत 18 लाख रूपये रोख घेतले. तसेच शिवापूर येथील दोन फ्लॅट बँकेत तारण ठेवून फिर्यादीला न सांगता सह्या घेवून दोन फ्लॅटवर 23 लाख रूपये कर्ज काढले. कर्जाची रक्कम व्याजापोटी स्वतःच्या अकांउटवर वर्ग केली. तसेच बँकेचे सर्व कागदपत्र, एटीएम कार्ड आणि इतर कागदपत्र आरोपींनी स्वतःकडे ठेवले आहेत.

राजगड पोलिसात गुन्हा दाखल

आरोपींनी 3 लाख 50 हजार रूपयांचे व्याज आणि दंडासहित फिर्यादीकडून 18 लाख आणि फ्लॅटवरील कर्ज 23 लाख, असे एकूण 41 लाख रूपये घेतले. याप्रकरणी फिर्यादीने आरोपींविरोधातच कायदेशीर फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.