रूपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, महिलांच्या संदर्भात पत्रात काय म्हंटलंय…
राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माहिती घेत त्याचा निष्कर्ष काढून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे.
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष (State Women Commission President) रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात या पत्रात नमूद केले आहे. राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होत असल्याचा मुद्दा चाकणकर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पत्रात नमूद करत महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. राज्यातील महिलांना सुरक्षिततेचे वातावरण तसेच त्यांचा आत्मविश्वास कायम रहावा यासाठी आपण आपल्या स्तरावर संबंधितांना सुचना देण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माहिती घेत त्याचा निष्कर्ष काढून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे.
राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले असून चाकणकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.
स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या सनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे, उंचावणे.
या गोष्टींशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट करत अंमलबजावणीसाठी विनंती केली आहे.
राज्यातील शहरी, ग्रामीण भागातील महिला व मुली बेपत्ता होत असल्या बाबतच्या बातम्या सातत्याने येत असल्याने राज्य महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा पत्रात उल्लेख करत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
राज्य महिला आयोग अधिनियम 1993 मधील कलम 10 (1) (जे) नुसार स्त्रियांना सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणेस सक्रिय करणे हा आयोगाच्या स्थापने मागचा उद्देश आहे. असा उल्लेख करत कर्तव्याबाबत आठवण करून दिली आहे.
गेल्या काही दिवसांत विविध वृत्तवाहिन्या व समाजमाध्यमांवर राज्यातील महिला व मुली बेपत्ता होत असल्याबाबतच्या बातम्या प्रसारित होत आहेत.महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.1/2@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/wsrzgVLMnp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 12, 2022
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रावर येत्या काळात काय अंमलबजावणी होते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.