व्हॉल्वो कार माझ्या नावे, पण ना वाझेंना भेटलो, ना अभिषेक अग्रवालला, मालक मनिष भातिजांचा दावा

गाडी तीन वर्षांपूर्वी बिझनेस पार्टनर इस्माईल दाडीवाल यांना वापरण्यास दिली होती. इस्माईल दाडीवाल यांनी ही गाडी अनिल अग्रवाल यांना दिली, अशी माहिती भातिजांनी दिली. (Volvo Car owner Manish Bhatija)

व्हॉल्वो कार माझ्या नावे, पण ना वाझेंना भेटलो, ना अभिषेक अग्रवालला, मालक मनिष भातिजांचा दावा
मनिष भातिजा (डावीकडे), सचिन वाझे
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 7:53 AM

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) वापरत असलेली व्हॉल्वो कार दमनमध्ये सापडल्यानंतर मूळ मालक मनिष भातिजा (Manish Bhatija) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे आणि अभिषेक अग्रवाल यांना कधीही पाहिलं नाही. अभिषेक अग्रवालची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भातिजा यांनी केली. (Sachin Vaze Volvo Car owner Manish Bhatija says havent met Abhishek Agrawal)

माझी व्हॉल्वो कार सापडणं हा विश्वासघात आहे. गाडी माझ्या नावावर आहे, पण ही गाडी तीन वर्षांपूर्वी बिझनेस पार्टनर इस्माईल दाडीवाल यांना वापरण्यास दिली होती. इस्माईल दाडीवाल यांनी ही गाडी अनिल अग्रवाल यांना दिली, अशी माहिती भातिजांनी दिली.

“अभिषेक अग्रवाल यांना कधीही पाहिलं नाही”

अनिल अग्रवाल हे दोन दिवसांपूर्वी अटक केलेला आरोपी अभिषेक अग्रवालचे वडील आहेत. गाडी दिल्याची डिलीव्हरी नोटही आहे, ज्यात इस्माईल दाडीवालचं नाव आहे. माझं नाव आता सगळे घेत आहेत, मी व्यावसायिक आहे आणि कोणताच दोष नाही. सचिन वाझे आणि अभिषेक अग्रवाल यांना कधीही पाहिलं नाही. अभिषेक अग्रवालची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मनिष भातिजांनी केली.

“मी कुठलाही गुन्हा केला नाही”

मला कधीही सरकारी यंत्रणा बोलवेल, तर माझा जबाब द्यायला मी तयार आहे. मी कुठलाही गुन्हा केला नाहीये, बातमी पाहून मला धक्का बसला. माझ्या बिझनेस पार्टनरचा हा विश्वासघात आहे. अभिषेकचे वडील अनिल अग्रवाल यांचीही चौकशी व्हायला हवी, असं भातिजा म्हणाले.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसला अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. एटीएसने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी वापरलेली वॉल्व्हो कार थेट दमणमधून जप्त केली आहे. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) टीमला वॉल्व्हो कारच्या डिकीमधून दोन बॅग सापडल्या आहेत. त्यामध्ये जीन्स आणि पांढरा शर्ट मिळाला आहे. त्या बरोबरच एक मास्क आणि मोबाईल चार्जरही आढळला आहे. एकूण तीन जोड कपडे आणि टॉवेल सापडले आहेत. (Sachin Vaze Volvo Car owner Manish Bhatija says havent met Abhishek Agrawal)

चूर्ण सदृश्य बाटल्या आणि सॅनिटायझरचा कॅन

गाडीच्या स्टेपनीच्या जागेत एका बॉक्समध्ये दोन चूर्ण सदृश्य बाटल्या, एक सॅनिटायझरचा कॅन मिळाला. गाडीत सापडलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर बोटांचे ठसे चेक केले जात आहेत. गाडीत पायाखाली असलेल्या मॅट झटकून त्यावरची माती ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीत अन्यत्र कुठेही बोटांचे ठसे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी

दमणला सापडलेल्या वाझेंच्या व्हॉल्वो कारची फॉरेन्सिक तपासणी; गाडीत जीन्स-शर्ट, चूर्ण सदृश्य बाटल्या आणि…

(Sachin Vaze Volvo Car owner Manish Bhatija says havent met Abhishek Agrawal)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.