साधू महाराजच झाले डिजिटल अरेस्ट, या राज्यातला सर्वात मोठा सायबर फ्रॉड, २.५२ कोटी रुपयांना गंडा
या साधू महाराजांची 2.4 लाखाची रक्कम सायबर चाच्यांच्या खात्यात वळती झाल्याने हा या राज्यातला सर्वात मोठा सायबर फ्रॉड ठरला आहे. पोलिसांनी सायबर चाच्यांची सर्व बँक खाती सील केली आहेत. मोबाईल नंबर वरुन त्यांचा शोध घेतला जात आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हैरच्या रामकृष्ण आश्रमाचे स्वामी सुप्रिदिप्तानंद यांना सायबर ठगांनी तब्बल २.५२ कोटी रुपयांना गंडा घातला आहे. सायबर चाच्यांनी त्यांना मनी लॉन्ड्रींगच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांना तब्बल २६ दिवस डिजिटल अटक करीत त्यांच्या खात्यातून पैसे स्ट्रान्सफर केले आहेत. स्वामींनी या प्रकरणात तक्रार केली आहे. हा मध्य प्रदेशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर फ्रॉड मानला जात आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हैरमध्ये रामकृष्ण आश्रमाचे स्वामी सुप्रिदिप्तानंद यांना सायबर गु्न्ह्याचा फटका बसला आहे. त्यांनी पोलिसांनी केलेल्या तक्रारीत सांगितले की त्यांना १७ मार्च रोजी एक कॉल आला होता. फोन करणाऱ्यांनी स्वत:ला महाराष्ट्र नाशिक येथेील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांना धमकी दिली. या तोतया पोलिसांनी त्यांच्यावर मनी लॉन्ड्रींगच्या आरोपीकडून कोटी रुपयांचा लेनदेन केल्याचा आरोप लावला. स्वामींनी या आरोपाचा इन्कार केला असता त्याने व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी स्क्रीनवर पोलीस ठाण्याचे दृश्य होते. यात नाशिक पोलीस ठाण्याचा बोर्ड आणि पोलीस युनिफॉर्ममध्ये तरुण बोलाताना दिसले.
या दरम्यान आरोपींनी त्यांना तुम्ही मनी लॉण्ड्रींगमध्ये अडकला आहात असे सांगितले.सायबर चाच्यांनी त्यांना धमक्या देऊन त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी न बोलण्यास सांगितले. सायबर चाच्यांनी दर एक तासांनी त्यांना घाबरवत राहीले. या दरम्यान त्यांची लोकेशन सारखी घेत होते. त्यांना घाबरवत होते,त्यांना धमकावून त्यांच्याकडून त्यांच्या बँकेचे डिटेल्स मिळवून २ कोटी ५२ लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यांना असे भासवले की हे पैसे त्यांना तपासपूर्ण झाल्यानंतर १४ एप्रिल रोजी परत मिळतील.
मध्य प्रदेशचा सर्वात मोठा सायबर फ्रॉड
१५ एप्रिलपर्यंत वाट पाहून त्यांनी त्या नंबरवर कॉल केला. त्यानंतर सर्व नंबर बंद आढळले. त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हा मध्य प्रदेशच्या इतिहासातील सर्वात मोठा सायबर फ्रॉड असल्याचे म्हटले जात आहे.
