Yavatmal fire : यवतमाळ येथील सागर फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंगला आग
या लागलेल्या आगीत 600 ते 700 कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या आहेत.
यवतमाळ : कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांनंतर आता कुठे उद्योग व्यवस्थित सुरू झाले आहेत. अनेकांचे रोजी रोटी प्रश्न मार्गी लागत आहे. तर सध्या कापूस (Cotton) खरेदी सुरू असून जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस साठवला जात आहे. या कापसाचे गठान तयार करण्याचे काम ही सध्या सुरू असते. यादरम्यान यवतमाळ मध्ये अनेकांच्या रोजीरोटीवरच कुऱ्हाड आली आहे. यवतमाळ शहरातील धामणगाव जवळ असणाऱ्या सागर फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंगला (Sagar Fibers Pvt. Ltd. Ginning) आज अचानक आग लागल्याचे समोर आले आहे. तर आगीत 600 ते 700 कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या आहेत. ज्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर आग लागल्याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. तर आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही.
600 ते 700 कापसाच्या गठाणी जळून खाक
याबाबात मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ शहरातील धामणगाव रोड मार्गावरील सागर फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंगला आज दुपारी अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत 600 ते 700 कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या आहेत. यानंतर याची माहिती लगेच नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला देण्यात आली. ज्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ज्यांनी आग आटोक्यात आणली आहे. तर या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. जिनिंगचे मालक जलाल गिलानी यांनी ही माहिती दिली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
गायत्री जिनिंगमध्ये आग लागली होती
तर याच्याआधीही येथील एमआयडीसीत पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र असलेल्या गायत्री जिनिंगमध्ये आग लागली होती. या आगीत गोदामात ठेऊन असलेली सरकी जळून खाक झाली होती. अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. तर कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच गोंधळ उडाला होता. तर त्यावेळी नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.