Islampur : या जिल्ह्यातील तीन खाद्यतेल व्यापाऱ्यांनी 84 कोटी 78 लाखांचा कर चुकवला, नंतर…
पेठमध्ये राहणाऱ्या संतोष देशमाने सुनीता देशमाने या पती-पत्नीचा महालक्ष्मी ऑइल इंडस्ट्रीज व महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या नावाने खाद्यतेलाची विक्री करण्याचा व्यवसाय आहे.
सांगली : इस्लामपूरमध्ये (Islampur) खाद्यतेलाचा व्यवसाय करुन राज्य सरकारचा (state government) 84 कोटींचा मूल्यवर्धित कर भरणा केला नाही, म्हणून तीन खाद्यतेल व्यापाऱ्याविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळवा (walwa) तालुक्यातील पेठ येथे महालक्ष्मी ट्रेडिंग, महेश व्हेज ऑईल आणि मे. महेशकुमार ट्रेडिंग अशी तीन कंपन्यांची नावं आहेत. एप्रिल 2011 ते मार्च 2016 या काळात खाद्यतेल विक्रीचा त्यांनी व्यवसाय केला.
एप्रिल 2011 ते मार्च 2016 या काळात खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय करण्यात आला. परंतु तीन कंपन्यांनी कसल्याची प्रकारचा कर भरला नसल्याचं उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या नावे व्हॅट कर नोंदणीही करण्यात आली होती. मात्र शासनाचा करभरणा केला नाही. यामुळे व्याजासह 48 कोटींचा कर भरणा केला नसल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कंपनी संचालक सुनिता देशमाने, संतोष देशमाने व मनोजकुमार जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठमध्ये राहणाऱ्या संतोष देशमाने सुनीता देशमाने या पती-पत्नीचा महालक्ष्मी ऑइल इंडस्ट्रीज व महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या नावाने खाद्यतेलाची विक्री करण्याचा व्यवसाय आहे. मूल्यवर्धित कर कायदा 2012 नुसार त्यांच्या व्यवसायाची कर विभागाकडे झाली आहे. दोघांनी खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय केल्यानंतर त्यावरील मूल्यवर्धित कर भरलेला नाही.
दोघांविरुद्ध 67 कोटी 88 लाख 199 रुपयांची कर चुकवेगिरी केल्याबद्दल तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, महेशकुमार जाधव याचाही महेश व्हेज ऑइल्स या नावाने महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत नोंदणी असलेला व्यवसाय आहे. त्यांनी सुध्दा एप्रिल 12 ते मार्च 2016 या कालावधीत केलेल्या तेल विक्री व्यवसायासाठी देय असणारी 16 कोटी 90 लाख 30 हजार 875 रुपयांचा कर, त्यावरील व्याज आणि शास्ती न भरल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.