कवठेमहांकाळ पुन्हा हादरले, माजी सरपंचाच्या भाच्याला भरचौकात भोसकले

अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. (Sangli Crime Amar Atapadkar Murder)

कवठेमहांकाळ पुन्हा हादरले, माजी सरपंचाच्या भाच्याला भरचौकात भोसकले
अमर आटपाडकरवर जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 1:20 PM

सांगली : सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याची हत्या होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच तालुक्यात आणखी एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याला दोघा अज्ञात हल्लेखोरांनी भोसकले आहे. (Sangli Crime Pimpalwadi Former Sarpanch Newphew Amar Atapadkar Murder)

कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्ल्यात अमर आटपाडकरचा मित्र विजय मानेही जखमी झाला आहे.

अमर आटपाडकरची प्रकृती नाजूक

अमर आटपाडकर याची परिस्थिती गंभीर आणि नाजूक असल्याची माहिती आहे. अमर आटपाडकर यांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्‍यानंतर पुढील उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आले आहे.

भाजपच्या पक्षाच्या सदस्याचा खून

सांगलीमध्ये उपसरपंच निवडणुकीतील वादातून बोरगावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याची 4 मार्चला हत्या झाली होती. पांडुरंग काळे हे भाजपचे सदस्य होते. धक्कादायक बाब म्हणजे, भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. हत्येप्रकरणी सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगलीतील कवठेमहांकाळ पोलिसांनी दोन्ही गटातील जवळपास 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे बोरगावात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर जखमी

उपसरपंच पदाच्या निवडणुकीवरुन झालेल्या मारहाणीत पांडुरंग काळे यांना प्राण गमवावे लागले. यावेळी राष्ट्रवादीचे दोन सदस्य जखमी झाले होते. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पांडुरंग काळे यांच्या हत्या प्रकरणामुळे गाव पातळीवरील ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये होणारं राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचलं आहे, हे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

सांगलीत उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्यांकडून स्वत:च्याच सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचा आरोप

सांगलीत उपसरपंच निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्याची हत्या, 39 जणांवर गुन्हे, सात अटकेत

(Sangli Crime Pimpalwadi Former Sarpanch Newphew Amar Atapadkar Murder)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.