AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे विधात्या इतका निष्ठूर का झालास? 3 कोवळ्या मुलींसह आईचंही आयुष्य नियतीनं हिरावलं

जत तालुक्यातील एका गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.

हे विधात्या इतका निष्ठूर का झालास? 3 कोवळ्या मुलींसह आईचंही आयुष्य नियतीनं हिरावलं
तीन लेकींसह आईही तलावात बुडालीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 2:46 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली जिल्ह्यात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आलीय. तीन लेकींसह आईचाही तलावात बुडून मृत्यू (Mother Daughter drown) झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तलावातील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सांगली (Sangli Drowned News) जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. ज्या तलावाजवळ धुण्याचे कपडे आणि साबण आढळून आला, त्याच तलावात तीन मुली आणि एका महिलेचा मृतदेह (Dead Body) तरंगत असल्याचं पाहून सगळेच हादरले.

समोर आलेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळूर गावातील तलावात 4 जणांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पडून चारही जण मृत्यूमुखी पडले. या सर्व मृतदेहांची ओळखही पटली असून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

जतमधील ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहांची तपासणी केली जाते आहे. तसंच स्थानिक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.मृत्यू झालेल्यांची नावं सुनिता माळी, अमृता माळी, अश्विनी माळी आणि ऐश्वर्या माळी अशी आहेत.

हे सुद्धा वाचा

मृत सुनिता माळी ही तलावात आढळलेलेल्या अन्य लहान मुलींची आई आहे, अशी माहिती समोर आलीय. सुनिता आणि तिच्या मुली पाण्यात नेमक्या कशामुळे बुडाल्या, याचं गूढही वाढलंय.

प्राथमिक माहितीनुसार, सुनिता माळी यांच्या घराजवळ एक तलाव आहे. या तलावाजवळ कपडे धुण्यासाठी त्या गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या तिन्ही मुलीही होत्या. साबण, धुण्यासाठीचे कपडे तलावाच्या जवळ आढळून आले आहेत.

त्यावरुन कपडे धुवत असताना तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला, असावा अशी शंका घेतली जाते आहे. सांगली जिल्ह्यातील्या जत तालुक्यातील पोलीसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

मृत्यू झालेल्यांची नावं :

  1. सुनीता माळी (वय 30),
  2. अमृता माळी (वय 13),
  3. अश्विनी माळी (वय 10)
  4. ऐश्वर्या माळी (वय 7)

संपूर्ण माळी कुटुंबीयांना या घटनेनं मोठा धक्का बसलाय. अख्खं बिळूर गाव या घटनेनं हादरुन गेलंय. तलावात चारही जण पडल्या कशा, त्याच्या बुडून मृत्यू होण्यामागचं नेमकं कारण काय? याचं गूढही वाढलंय. हा अपघात होता की घातपात, या संशयावरुन अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आता पोलिसांच्या चौकशीतून नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....