भररस्त्यात मारहाण करुन पहिल्या पत्नीचा विनयभंग, माजी नगरसेवकाला अटक

सांगलीतील माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने मार्केटमध्ये पहिल्या पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

भररस्त्यात मारहाण करुन पहिल्या पत्नीचा विनयभंग, माजी नगरसेवकाला अटक
माजी नगरसेवक अशोक कांबळे
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:52 AM

सांगली : रिपब्लिकन पार्टी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे (Ashok Kamble) यांना अटक करण्यात आली आहे. कांबळेंविरोधात सांगलीतील मिरजमध्ये दोन आठवड्यांपूर्वी पहिल्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांबळेंसह त्यांच्या दुसऱ्या पत्नीने भर रस्त्यात पहिल्या पत्नीला मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. अशोक कांबळे यांच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Sangli former corporator Ashok Kamble arrested for first wife’s molestation)

भर मार्केटमध्ये मारहाण केल्याचा दावा

माजी नगरसेवक अशोक कांबळे यांची पहिली पत्नी काही दिवसांपूर्वी भाजी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. त्यावेळी अशोक कांबळे हे एका महिलेसोबत तिला आढळून आले. चार महिने घरी आला नाहीत, घरी चला असे पहिल्या पत्नीने अशोक कांबळे यांना दटावले. यावेळी अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

कांबळेंसह दुसऱ्या पत्नीवरही पहिल्या बायकोचा आरोप

धक्कादायक म्हणजे आपले कपडे फाडल्याची तक्रारही पहिल्या पत्नीने अशोक कांबळे आणि दुसऱ्या पत्नीविरोधात केली होती. याबाबत मिरज शहर पोलिसात अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी कांबळेंना बेड्या ठोकल्याचं वृत्त आहे.

महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन

दुसरीकडे, वसई विरार महापालिकेच्या तुलिंज हॉस्पिटलमधील एका महिला आणि पुरुष डॉक्टरसोबत असभ्य वर्तन करण्यात आल्याचा प्रकारही नुकताच उघडकीस आला होता. दारुच्या नशेत आलेल्या रुग्ण आणि त्याच्या मित्रांकडून दोघांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याचप्रमाणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. तुलिंज हॉस्पिटलमधील केबिनच्या काचाही टोळक्याने फोडल्या होत्या.

संबंधित बातम्या :

माजी नगरसेवकासह दुसऱ्या पत्नीने मार्केटमध्ये कपडे फाडले, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार

नवविवाहित मुलीची आई-वडिलांकडून हत्या, कोरोनाने बळी गेल्याचा बनाव

(Sangli former corporator Ashok Kamble arrested for first wife’s molestation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.