Sangli Crime : एक होती तरी दुसरी हवी! त्यो म्हनला म्या पोलीस माझी 50 एकर जमीन, पहिलीला अंधारात ठेवून दुसरीशी केलं लगीन
सांगलीत घडलेला हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल (Sangli Crime) असाच आहे. आता मात्र या भामट्याचं बिंग फुडलं आहे. त्याच्या अडचणी आता चांगल्याचा वाढण्याची शक्यता आहे.
सांगली – दोन बायका, फजिती ऐका, अशी अनेकांची फजिती होताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल. मात्र यावेळी एक असा प्रकार समोर आलाय की एका भामट्यानं मला भरपूर जमीन आहे. मी पोलीस अधिकारी (Sangli Police)आहे असे सांगूण एका तरुणीची फसवणूक केली. हे प्रकरण फक्त फसवणुकीवर थांबलं नाही, तर या भामट्याने दुसरं लग्नही केलं. मात्र सुरूवातील स्व:ताला पोलीस अधिकारी सांगणार हा भामटा आता पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिसमध्ये (Most Wanted) गेलाय. पोलीस याचा शोध घेत आहेत. सांगलीत घडलेला हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल (Sangli Crime) असाच आहे. आता मात्र या भामट्याचं बिंग फुडलं आहे. त्याच्या अडचणी आता चांगल्याचा वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या दुसऱ्या पत्नीने हा प्रकार समोर आल्यावर थेट पोलिसांत धाव गेतली आहे.
कुठे घडला हा भयानक प्रकार?
मिरजेत एका भामट्याने माझी 50 एकर शेती आहे आणि पोलीस अधिकारी आहे. असे सांगून पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं. आणि भामट्या पतीवर पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. तर भामटा पती सद्या फरार आहे. मारुती श्रीकांत माने वय 37 राहणार मुळचा शिंदेवाडी सद्या राहणार महादेव कॉलनी मालगाव रोड मिरज. या भामट्याने खोटे बोलून दुसरे लग्न केल्या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मारुती माने याचे मालगाव रोड बडाक हॉस्पिटल मागे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेशी पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तो ट्रक चालक काम करत होता.
कसं बिंग फुटलं?
तीन महिन्यापूर्वी मारुती माने हा राधानगरी येथे कामाला जात आहे. म्हणून घरातून गेला तो परत आला नाही. शेजारी काही लोकांनी महादेव कॉलनी येथे रोज फिरताना मारुती माने याला पाहिले. शेजाऱ्यांनी पहिल्या पत्नीला सांगितले असता तीने महादेव कॉलनी येथे चौकशी केली असता येथे एका तरुणीशी लग्न करून राहत असल्याची माहिती खरी ठरली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर भामटा फरार
माझी 50 एकर शेती आहे. आणि PSI आहे असे सांगून त्या तरुणीशी लग्न केले होते. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची आढळून आल्यानंतर मग मिरज शहर पोलीस ठाण्यात दोन्ही पत्नीनी धाव घेतली. याप्रकरणी पत्नीने मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून खोटे बोलून दुसरे लग्न केल्याचा गुन्हा मारुती माने याच्यावर दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होण्याचे भीतीने मात्र भामटा पती फरार झाला आहे.