सांगलीत भाजप नगरसेवकावर गोळीबार, भरस्त्यात गाडी अडवून विजय ताड यांची हत्या

जत येथील भाजपचे नगरसेवक विजय ताड हे आपल्या कारने चालले होते. यावेळी अज्ञात आरोपींनी भररस्त्यात त्यांची कार अडवून त्यांच्यावर हल्ला केला.

सांगलीत भाजप नगरसेवकावर गोळीबार, भरस्त्यात गाडी अडवून विजय ताड यांची हत्या
भाजप नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणी गुन्हा दाखलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 3:14 PM

सांगली / शंकर देवकुळे : सांगलीतील जत नगरपालिकेचे भाजप नगरसेवकाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास करत आहेत.

आधी गोळ्या घातल्या मग डोक्यात दगड घातला

विजय ताड हे जत येथील भाजपचे नगरसेवक आहेत. ताड हे शुक्रवारी दुपारी सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ आपल्या इनोव्हा कारमध्ये होते. यावेळी अज्ञातांनी त्यांची कार अडवली. यानंतर आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. घटना उघड होताच परिसरात एकच गोंधळ उडाला.

मुलांना शाळेत आणायला चालले होते

नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या अल्फान्सो स्कूलमध्ये आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताड यांची ईनोव्हा गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. त्यानंतर ताड हे गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये ते जागीच ठार झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

हत्येचे कारण अस्पष्ट

या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला आहे हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.