संशयाचा किडा मनात घुसला अन् मायलेकी जीवाला मुकल्या, नेमकं काय घडलं?

सोमवारची सकाळ सांगलीकरांसाठी एक वाईट बातमी घेऊन उगवली. कुणीकोनूर सकाळी एका घरात मायलेकिचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

संशयाचा किडा मनात घुसला अन् मायलेकी जीवाला मुकल्या, नेमकं काय घडलं?
सांगलीत मायलेकिची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 3:58 PM

सांगली / शंकर देवकुळे : सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुणीकोनूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईसह अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रियंका बेंळुखी असे मयत महिलेचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पतीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांडात आणखी कुणाचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

जत तालुक्यात घडले दुहेरी हत्याकांड

जत तालुक्यातील कुणीकोनूर येथे काल रात्री ही दुहेरी हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. कुणीकोनूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथील बिराप्पा बेळंखी यांच्या घराजवळील झोपडीत ही दुहेरी हत्या घडली. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिसांत दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

पतीसह चौघांना घेतले ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून पती बिरप्पा याच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले होते. हत्याकांडाविषयी विविध चर्चा परिसरात सुरु आहेत. मात्र या मायलेकिंची हत्या चारित्र्याच्या संशयातूनच झाल्याचे, पोलीस तपासात उघड झाले आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या महिन्यात कोसारी येथे दुहेरी हत्याकांड झाले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.