झोपलेल्या सावत्र आईवर कुऱ्हाडीचे वार, हत्येप्रकरणी सांगलीत मुलाला अटक

सावत्र आई नंदा सुर्वे झोपेत असताना अमोलने तिची कुर्‍हाडीने हल्ला करुन निर्घृण हत्या केली. (Sangli Son murder step mother)

झोपलेल्या सावत्र आईवर कुऱ्हाडीचे वार, हत्येप्रकरणी सांगलीत मुलाला अटक
सांगलीत मुलाकडून सावत्र आईची हत्या
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 2:27 PM

सांगली : सांगलीत तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 50 वर्षीय नंदा सुर्वे यांची झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करुन मुलाने हत्या केली. (Sangli Son arrested for alleged murder of step mother)

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावात घडलेल्या या हत्याकांडाने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादातून 35 वर्षीय आरोपी अमोल सुर्वेने ही हत्या केल्याचा आरोप आहे.

झोपेतच सावत्र आईवर कुर्‍हाडीने हल्ला

सावत्र आई नंदा सुर्वे झोपेत असताना अमोलने तिची कुर्‍हाडीने हल्ला करुन निर्घृण हत्या केली. याबाबत महिलेचे पती संभाजी सुर्वे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमोल सुर्वे याला सांगलीतील कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

पोटच्या मुलाची हत्या

दुसरीकडे, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच खून केला असल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील आडगावमधील नांदूरनाका येथे काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. सहा वर्षीय चिमुरड्याच डोकं भिंतीवर आपटून आईनेच त्याचा जीव घेतल्याचं समोर आलं होतं. आडगाव पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकाराला बेड्या ठोकल्या होत्या.

मुलगा खेळताना पडल्याचा बनाव

मुलगा अंगणात खेळता खेळता पडला असा बनाव रचून आई आणि तिच्या प्रियकराने 22 डिसेंबरला मुलाला जिल्हा रुग्णलयात दाखल केलं आणि उपचार सुरू असतानाच या मुलाचा मृत्यू झाला, मात्र, नंतर डॉक्टरांनी आईची चौकशी केली असता आईने प्रियकरासोबत पळ काढला होता. (Sangli Son arrested for alleged murder of step mother)

आत्महत्येच्या प्रयत्नात महिला बचावली, अनवधानाने मुलाचा मृत्यू

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचला, मात्र अनवधानाने तेच आईस्क्रिम खाललेल्या तिच्या मुलाचा आणि बहिणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात समोर आला होता. आत्महत्येचा प्रयत्न आणि हत्येप्रकरणी केरळ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या –

माता न तू वैरिणी…आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू

(Sangli Son arrested for alleged murder of step mother)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.