Sangli News : चहाचा घोट ठरला विषाचा प्याला! मांत्रिकानेच विष कालवल्यानं 9 जणांच्या आयुष्यावरच घाला, सांगलीतलं शॉकिंग हत्याकांड

Sangli Suicide of 9 members : वनमारे कुटुंबाला मांत्रिकाने त्याच्या ड्रायव्हरच्या मदतीने ठार मारलं.

Sangli News : चहाचा घोट ठरला विषाचा प्याला! मांत्रिकानेच विष कालवल्यानं 9 जणांच्या आयुष्यावरच घाला, सांगलीतलं शॉकिंग हत्याकांड
धक्कादायक हत्याकांड
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 2:17 PM

सांगली : सांगलीतील (Sangli Suicide Mystery) 20 जून रोजी घडलेल्या खळबळजनक घटनेचं रहस्य उलगडलंय. 9 जणांच्या आत्महत्येची शंका व्यक्त केली जात होती. विष देऊन वनमारे बंधूनी आपलं आयुष्य संपवलं, असं सांगितलं जातं होतं. पण या घटनेच्या सात दिवसांतच पोलिसांनी धक्कादायक (Murder Mystery) खुलासा केला. 9 जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्याच झाली होती, असं पोलीस तपासासून उघड झालं. या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांनी (Sangli Crime News) केलेल्या खुलाशाने काळजाचा थरकाप उडालाय. मांत्रिकाच्या नादापायी वनमाने कुटुंब उद्धव्स्त झाल्याचं समोर आलं. चकीत करणारी बाब म्हणजे मांत्रिकानं या कुटुंबाला चहातून विष दिलं. चहाचे घोटच वनमारे कुटुंबासाठी मृत्यूचं कारण ठरलं.

आत्महत्या नव्हे, हत्याच!

वनमारे कुटुंबाला मांत्रिकाने त्याच्या ड्रायव्हरच्या मदतीने ठार मारलं. चहात विष कालवून या मांत्रिकानं आणि त्याच्या ड्रायव्हरने हे भयानक हत्याकांड रचलं होतं. अब्बास मोहम्मद अली बागवान असं या मंत्रिकाचं नाव आहे. हा मुख्य आरोपी असून त्याच्या ड्रायव्हरचाही या हत्याकांडात हात आहे. या मांत्रिकाच्या ड्रायव्हरचं नाव धीरज चंद्राक सुरवसे आहे.

चहाचा विषारी घोट!

हा मांत्रिक रदस्यमय खजाना शोधण्यासाठी वनमारे कुटुंबाच्या घरात आला होता. यावेळी त्यानं कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत पाठवलं. त्यानंतर त्यानं एकएकाला खाली बोलावलं. मग त्यांना चहा पिण्यास सांगितलं. चहा पिऊन एक एक जण बेशुद्ध पडला. बेशुद्ध झालेल्या या घरातील प्रत्येक कुटुंबानं त्याच अवस्थेत शेवटचा श्वास घेतला होता.

हे सुद्धा वाचा

दोघांना अटक!

पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यंची कसून चौकशी केली जातेय. 20 जून रोजी वनमारे बंधूंच्या आत्महत्येनं संपूर्ण म्हैसाळ गाव हादरुन गेलं होतं. 9 जणांचे मृतदेह घरात निपचित पडल्याचं समोर आल्यानंतर गावकरी हादरुन गेले होते. याबाबत नंतर पोलिसांनी कळवण्यात आलं होतं. डॉक्टर आणि शिक्षक बंधूंच्या आत्महत्या झाली असल्याचं समजताच संपूर्ण सांगली हादरलेलील. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.

डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधनाची आस होती. गुप्तधनाच्या लालसेपोटी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता. त्यानंतर कर्जात बुडाल्यामुळे आणि आर्थिक संकटातून वनमोरे बंधू यांनी जीव दिल्याची शंका घेतली जात होती. अखेर खळबळ सत्य पोलिसांच्या तपासातून उघड झालंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.