AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो, सारा शर्माच्या मोहिमेनंतर अभिनेत्याची चौघांविरोधात तक्रार

'देवो के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैना (Mahadev Fame Actor Mohit Raina) याने चार जणांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो, सारा शर्माच्या मोहिमेनंतर अभिनेत्याची चौघांविरोधात तक्रार
Actor Mohit Raina
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 3:08 PM

मुंबई : ‘देवो के देव महादेव’ फेम अभिनेता मोहित रैना (Mahadev Fame Actor Mohit Raina) याने चार जणांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘महादेव’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट आणि ‘भौकाल’ ‘काफिर’ या वेब सीरिजमधून एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित रैनाबद्दल काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक दावा करण्यात आला होता (Sara Sharma Claimed That Mahadev Fame Actor Mohit Rainas Life Was In Danger Now The Actor Filed Complaint Against Four).

‘सेव्ह मोहित’ मोहीम

मोहित रैनाबद्दल त्याची कथित स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्माने सोशल मीडियावर ‘सेव्ह मोहित’ मोहीम ही चालवली होती. तिच्या म्हणण्यानुसार, मोहितच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो.

मात्र, कालांतराने मोहितच्या घरातले आणि स्वत: मोहितने समोर येऊन मी अगदी फिट आणि फाईन असल्याचे सांगितले.

चौघांविरोधात तक्रार

या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार, बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी मोहितचा जबाब नोंदवून सारा शर्मा आणि तिच्यासोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी यांच्याकडून त्रास दिल्याचे मोहितने तक्रारीत म्हटले आहे.

मोहित यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

मोहित रैना कोण आहे?

टीव्हीवर भगवान शिवची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मोहित रैनाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मोहितने ‘देवों के देव-महादेव’ या मालिकेत भगवान शिवची व्यक्तिरेखा इतकी सुंदररित्या साकारली की लोकांच्या हृदयात त्याची प्रतिमा भगवान शिवची बनली आहे. मोहित टीव्हीच्या जगात एक सुप्रसिद्ध अभिनेता झाला आहे.

2005 मध्ये मोहितने ‘ग्रेसिम मिस्टर इंडिया’ च्या मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. यात मोहितला 5 वा क्रमांक मिळाला. त्यानंतर मोहित रैनाने 2005 मध्ये ‘अंतरिक्ष’ या सायन्स फिक्शन मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘भाभी’, ‘चहेरा’, ‘बंदिनी’, ‘गंगा की धीज’,‘देवों के देव…महादेव’, ‘महाभारत’, ‘चक्रवर्तिन अशोका सम्राट’, ‘21 सरफरोश-सारागढी 1897’ या मालिकांमध्ये काम केलं. यापैकी ‘देवों के देव…महादेव’ या मालिकेने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

मोहितने ‘डॉन मुथु स्वामी’, ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’, ‘काफिर’ या सिनेमांमधेही काम केलं आहे.

Sara Sharma Claimed That Mahadev Fame Actor Mohit Rainas Life Was In Danger Now The Actor Filed Complaint Against Four

संबंधित बातम्या :

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत, पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.