महिला शिपायावर अत्याचार प्रकरणातील आरोपी अनीसचे एन्काऊंटर, अयोध्या ट्रेन प्रकरणाची संपूर्ण कहानी

30 ऑगस्ट रोजी शरयु ट्रेनच्या सीटखाली एक महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत सापडली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलीसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे.

महिला शिपायावर अत्याचार प्रकरणातील आरोपी अनीसचे एन्काऊंटर, अयोध्या ट्रेन प्रकरणाची संपूर्ण कहानी
express Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 1:36 PM

लखनऊ | 22 सप्टेंबर 2023 : अयोध्यामध्ये शरयू एक्सप्रेसमध्ये एका महिला हेड कॉन्स्टेबलवर भयंकर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनीस याला उत्तरप्रदेश एसटीएफने एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे. या एन्काऊंटरमध्ये त्याचे दोन साथीदार आझाद आणि विशंभर दयाल हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांनी महिला कॉन्स्टेबलचे ट्रेनमध्ये छेड काढली होती. तिने प्रतिकार केल्यानंतर तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

30 ऑगस्ट रोजी शरयु ट्रेनच्या सीटखाली एक महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत सापडली होती. सध्या लखनऊच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. या महिला कॉन्स्टेबलवरील अत्याचारानंतर उत्तर प्रदेश हादरला होता. त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणात स्वत: हून दखल घेत सरकारला तपास करण्याचे आदेश दिले होते. 30 ऑगस्ट रोजी शरयु एक्सप्रेसच्या सिट खाली महिला कॉन्स्टेबल सुमित्रा पटेल या जखमी अवस्थेत सापडल्या होत्या. त्यांचे कपडे अस्तव्यस्त होते. आणि नाक आणि डोक्यातून रक्त वाहत होते. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लखनऊच्या केजीएमयूमध्ये हलविण्यात आले.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. विरोधी पक्षांनी सरकारला घेरले. अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस प्रीतिंकर दिवाकर यांनी 3 सप्टेंबरच्या रात्री स्वत:च्या घरी कोर्ट भरवून कॉन्स्टेबलवर झालेल्या अत्याचार प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल केली. महिला कॉन्स्टेबल ऑपरेशन करुन तिचे प्राण वाचविण्यात यश आले. तिला बोलता आल्यानंतर तिने आरोपी तीन असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मनकापूर आणि अयोध्या स्थानकाचे सीसीटीव्ही तपासले असता आरोपी एकत्र जाताना दिसले. त्यानंतर त्यांची ओळख पटली.

असे झाले एन्काऊंटर

पोलीसांनी आरोपींच्या शोधासाठी आपले खबऱ्यांचे जाळे वापरले. घटनेवेळी जेवढे फोन नंबर सक्रीय होते त्यांचा रेकॉर्ड तपासला. 22 सप्टेंबरच्या पहाटे आरोपीचे लोकेशन ट्रेस झाले. इनायतनगरात आरोपी लपल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना सरेंडर व्हायला सांगितले. आरोपी अनीस, विशंभर आणि आझाद यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनीस गंभीर जखमी झाला. त्याला नंतर रुग्णालयात मृत घोषीत करण्यात आले. या प्रकरणात पुराकलंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रतन शर्मा आणि अन्य दोन पोलीस देखील जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.