CCTV : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांनो सावधान! साताऱ्यात घडला खळबळजनक प्रकार

पेट्रोल पंपावरील लुटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा त्या कर्मचाऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

CCTV : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांनो सावधान! साताऱ्यात घडला खळबळजनक प्रकार
पेट्रोल पंपावरील लुटीचा थरारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 1:25 PM

संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा : साताऱ्यातील (Satara Crime News) एका पेट्रोल पंपावर धक्कादायक घटना घडली. ग्राहक बनून आलेल्या लुटारुंनी पेट्रोल पंपावर (Petrol Pump) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच लुटलंय. हा सगळा धक्कादायक प्रकार पेट्रोल पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाला. याप्रकरणी आता सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास केला जातोय.

सातारा जिल्ह्यातील आळजापूर येथे श्री भवानी देवी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका लाल रंगाची स्विफ्ट कार आली. या कारमध्ये चार जण होते. या कारमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी पेट्रोल भरत होता. त्या वेळी कारमधील चारही जण एक एक करुन उतरले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याला घेरलं.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल भरताना कर्मचाऱ्याला धमकावलं आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडे असलेली रोख रक्कम लुटली. कर्मचाऱ्याकडे असलेली 30 हजार रुपयांची रोकड घेतल्यानंतर लुटारु पुन्हा गाडीत बसले आणि त्यांनी पेट्रोल पंपावरुन पळ काढला. सर्व लुटारींनी चेहरा सीसीटीव्ही दिसू नये म्हणून तोंडावर रुमाल बांधला होता.

दरम्यान, लुटारुंनी कर्मचाऱ्याकडील रोकड पळवल्यानंतर पेट्रोल पंपावरील इतर कर्मचारी मदतासाठी धावले. लुटारुंना पकडण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांनी लुटारुंच्या कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण लोणंद जवळच्या हद्दीत असताना लुटारुंनी कार सोडून दिली आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

अधिक तपास सुरु

लोणंद पोलिसांत या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नाकाबंदी देखील केली. पण तरिही चोरटे कुठे पसार झाले, हे कळू शकलेलं नाही. सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि नाकाबंदी करुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. तर लुटारुंनी वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कारही पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरलीये.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.