Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटण दिलं नाही म्हणून मुलानं वडिलांना मारलं! कुऱ्हाडीनं सपासप वार, साताऱ्यात खळबळ

Satara Murder : पांडुरंग बाबुराव सस्ते असं हत्या करण्यात आलेल्या वडिलांचं नाव आहे. नटराज पांडुरंग सस्ते या त्यांच्या मुलानेच त्यांचा कुऱ्हाडीनं वार करत जीव घेतला.

मटण दिलं नाही म्हणून मुलानं वडिलांना मारलं! कुऱ्हाडीनं सपासप वार, साताऱ्यात खळबळ
धक्कादायक!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 11:38 AM

सातारा : साताऱ्यातून धक्कादायक (Satara Crime) घटना समोर आली आहे. एका मुलानं आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केला. शेतात पाठलाग करुन या मुलानं आपल्या वडिलांचा कुऱ्हाडीनं वार करत हत्या केली. ही धक्कादायक घडना सातारा जिल्ह्यातील माण (Man Taluka, Satara District) तालुक्यातील एका गावात खळबळजनक हत्याकांड उघडकीस आलंय. शुक्रवारी (29 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. ज्या कारणामुळे मुलानं वडिलांचा जीव घेतला, ते कारणंही हादरवून टाकणारं आहे. मटण (Mutton Murder) खायला दिलं नाही, म्हणून मुलानं वडिलांचा खून केला. मटण का खायला घालत नाही, या वरुन मुलगा वारंवार आपल्या वडिलांशी वाद घालत होता. गरीब शेतकरी कुटुंबातील या मुलानं वडिलांचीच हत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्यानं आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, या आधीदेखील तरुणानं वडिलांवर जीवघेणा हल्ला केला होता. मटण का आणलं नाही, या कारणवरुन हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मात्र यावेळी तर माथेफिरु मुलानं चक्क वडिलांचा कुऱ्हाडीनं सपासप वार करत जीवच घेतलाय.

नेमकी घटना कुठची?

माण तालुक्यातील कासारवाडी इथं ही खळबळजनक घटना घडली. पांडुरंग बाबुराव सस्ते असं हत्या करण्यात आलेल्या वडिलांचं नाव आहे. नटराज पांडुरंग सस्ते या त्यांच्या मुलानेच त्यांचा कुऱ्हाडीनं वार करत जीव घेतला. शेतात पाठलाग करुन नटरानं वडील पांडुरंग यांच्यावर सपासप वार केले आणि त्यांची हत्या केली. शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

हत्येच्या दिवशी काय घडलं होतं?

नटराज सत्ते हा युवक मटणाचा शौकिन होता. वारंवार तो आपल्या वडिलांकडे मटणासाठी मागणी करत होता. मटण खायला मिळत नाही, म्हणून त्याची नेहमी तक्रार असायची. पण घरची परिस्थिती नसल्यामुळे नेहमी मटण परवडत नाही, असं सांगून वडील त्याची मागणी फेटाळून लावत होते. तरिदेखील तो वडिलांना मटणासाठी धमकावत होता.

मटण वारंवार का नाही आणत आणि मला का खायला घालत नाही, असं विचारुन हुज्जत घालणाऱ्या नटराजचं एक दिवस डोकं भडकलं. 29 एप्रिल रोजी सकाळी तो वडिलांकडे मटणासाठी आग्रह करु लागला होता. पण पैसेच नसल्यामुळे मटण आणणं शक्य नाही, असं त्याचे वडील त्यांना समजावत होते. पैसे नसल्यानं वडिलांनी मटण आणणंही टाळलं होतं. त्यामुळे प्रचंड चिडलेल्या नटराजनं आपल्याच वडिलांचा कुऱ्हाडीनं वार करत खून केलाय.

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.