नवऱ्याचे तुकडे केले…. 11 दिवस बॉयफ्रेंडसोबत हिमाचलमध्ये, आता ‘मुस्कान’ प्रेग्नेंट; ‘त्या’ हत्याकांडप्रकरणी धक्कादायक उलगडा!
सौरभ राजपूत हत्याकांडातील आरोपी मुस्कान आता गर्भवती असल्याचे समोर आले आहे. तुरुंगात असताना तिची प्रकृती बिघडली होती.

Saurabh Rajput Murder Case : मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. पत्नी मुस्कान हिने आपला प्रियकर साहील शुक्ला याला सोभत घेत राजपूत यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. दरम्यान, या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मुस्काबाबात मोठी माहिती समोर येत आहे. तुरुंगात असलेली मुस्कान ही गर्भवती असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.
मुस्कान गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात
मसु्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी सौरभ राजपूतचे हात, पाय, डोके कापले होते. तसेच शरीराचे आणखी तुकडे करून ते ड्रममध्ये टाकले होते. सोबतच ड्रममध्ये सिमेट टाकून त्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. हीच मुस्कान आता गर्भवती असल्याचे चाचणीतून समोर आले आहे. मुस्कान गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात आहे.
दोन दिवसांपासून बिघडली होती प्रकृती
मिळालेल्या माहितीनुसार सौरभ राजपूत यांची हत्या केल्यानंतर मुस्कान तिच्या प्रियकरासोबत हिमाचल प्रदेशला फिरायला गेली होती. एकूण 11 दिवस ते दोघे हिमाचल प्रदेशमध्ये होते. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर या दोघांनी मुस्कानने साहिलसोबत लग्न केल्याचंही म्हटलं जातं. सध्या तुरुंगात असलेल्या मुस्कानची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.
सोनोग्राफी केल्यानंतरच सर्व बाबी समजणार
दरम्यान, मुस्कान किती महिन्यांची गर्भवती आहे, हे समजू शकलेले नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अल्ट्रासाऊंट सोनोग्राफी केल्यानंतरच गर्भ किती महिन्यांचा आहे हे समजू शकेल. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून मुस्कान आणि साहिल एकमेकांच्या संपर्कात होते.
कशी केली होती होत्या?
सौभर राजपूत हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचे. मात्र त्यांनी ती नोकरी सोडल्यानंतर ते लंडनमध्ये गेले होते. तेथे ते एका बेकरीत काम करायचे. दोन वर्षांनी ते भारतात परतले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात परतल्यानंतर पुढच्याच आठवड्यात त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यांची पत्नी मुस्कान आणि मुस्कानचा प्रियकर साहिल यांनी मिळून ही हत्या केल्याचा आरोप आहे. सौरभ यांची हत्या करून या दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले होते. हे तुकडे त्यांनी एका ड्रममध्ये भरले. त्यानंतर या ड्रममध्ये सिंमेट टाकून त्यात पाणी भरले. सिमेंटमध्ये मृतदेहाचे तुकडे घट्ट झाल्याने ते कुजले नवहते. तसेच दुर्गंधीही येत नव्हती. मात्र सौरभ आणि मुस्कान यांच्या मुलीच्या सांगण्यावरून या हत्याकांडाचा उलगडा झाला होता. या प्रकरणी आता मुस्कान आणि तिचा प्रियकर सध्या तुरुंगात आहेत.