Senior citizen : वयाच्या 75 व्या वर्षी महिलेला लग्नाच स्वप्न दाखवून इतक्या लाखांना फसवलं, माटुंग्यातील घटना

Senior citizen : या महिलेला कसं जाळ्यात अडकवलं ते जाणून घ्या. उतारवयातही जोडीदाराचा शोध घेतला जातो. वृद्धापकाळात काहीजण विवाहाच्या बोहल्यावर चढतात. फसवणूक झालेली महिला माटुंग्यात फाइव्ह गार्डन्स येथे पॉश वस्तीत एकटी राहते.

Senior citizen : वयाच्या 75 व्या वर्षी महिलेला लग्नाच स्वप्न दाखवून इतक्या लाखांना फसवलं, माटुंग्यातील घटना
marriage
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 12:06 PM

मुंबई : तरुण वयात जोडीदाराची जितकी आवश्यकता असते, आयुष्याच्या उत्तरार्धातही तितकीच निकड असते. उतारवयात सुखं, दु:ख शेअर करण्यासाठी सोबतीला कोणातरी हवं, असं वाटतं. मनाचा एकेटपणा खायला उठतो. भले तुमच्याकडे कितीही संपत्ती, पैसा असला, तरी वार्धक्यात माणूस हळवा होतो. एरवी स्वभावात दिसणारा करारी, ठामपणा गळून पडतो. कारण कोणाची तरी साथ हवी असते, आपण कोणावर तरी अवलंबून असतो.

आता काळ बदललाय. त्यामुळे उतारवयातही जोडीदाराचा शोध घेतला जातो. वृद्धापकाळात काहीजण विवाहाच्या बोहल्यावर चढतात. काहीवेळा त्यात फसवणूक सुद्धा होते.

माटुंग्यात गुन्हा आसाममध्ये अटक

माटुंग्यात अशीच एका वयोवुद्ध महिलेची फसवणूक झाली. यामागे फसवणूक करणारी एक नायजेरियन टोळी आहे. या टोळीतील एकाने जर्मन सदस्य असल्याच भासवून एका 75 वर्षीय वयोवुद्ध महिलेची फसवणूक केली. या प्रकरणात माटुंगा पोलिसांनी आसाममधून थिंग्यो रिंगफामी (26) आणि सोलान (22) या दोन मणिपुरी युवकांना अटक केली. पोलीस आता फरार असलेल्या नायजेरियन आरोपींच्या शोधात आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

व्हॉट्स App वर आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवरुन मेसेज

फसवणूक झालेली महिला माटुंग्यात फाइव्ह गार्डन्स येथे पॉश वस्तीत एकटी राहते. ती जोडीदाराच्या शोधात होती. त्यावेळी तिला व्हॉट्स App वर आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवरुन मेसेज आला. समोरच्या माणसाने ख्रिस पॉल जर्मन नागरिक म्हणून स्वत:ची ओळख करुन दिली.

जर्मन नागरिक भासवणाऱ्याने काय सांगितलं?

“आरोपीने आपण खूप श्रीमंत कुटुंबातून असल्याची माहिती दिली. पत्नीच निधन झाल्यामुळे दुसर लग्न करण्यासाठी वधूच्या शोधात असल्याच सांगितलं. लवकरच मुंबईत येणार असून त्याने पीडित महिलेसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली” वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

किती लाख ड्युटी भरली?

नोव्हेंबरमध्ये त्याने महिलेला आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन केला. महागड्या भेटवस्तू पाठवल्याच त्याने सांगितलं. त्यानंतर तिला दुसऱ्यादिवशी एक फोन आला. समोरच्या माणसाने, आपण कस्टममधून बोलत आहोत, वस्तू नेण्यासाठी 3.85 लाख रुपये ड्युटी भरावी लागेल असं सांगितलं. किती लाखांची फसवणूक?

महिलेने ते पैसे भरले. जर्मन माणसाने ते सर्व पैसे परत करण्याच आश्वासन दिलं. काही दिवसांनी त्या जर्मन माणसाने फोन केला. आपण भारतात आलोय. पण कस्टम विभागाच्या ताब्यात आहोत. तिथून निघण्यासाठी ड्युटी भरावी लागेल असं सांगितलं. त्याने महिलेला पटवून दिलं व 8 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर तो माणूस आणि त्याची गिफ्ट कधी मिळालीच नाहीत. अशा प्रकारने एका वयोवुद्ध महिलेला तब्बल 12 लाख रुपयांना चूना लावला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.