इन्स्टाग्रामवर मैत्री, भेटायला बोलावून अत्याचार करत ब्लॅकमेलिंग; ‘असा’ अडकला सिरियल रेपिस्ट
लॉस एंजेलिसच्या वालनट परिसरात बलात्कार आणि लूटची घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपीचे नाव मायकल नील वाटसन ज्युनियर असल्याचे उघड झाले.
नवी दिल्ली : इन्स्टाग्रामवर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मग त्यांच्यावर बलात्कार करणारा सिरियल रेपिस्ट अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या दोन वर्षात आरोपीने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे पोलिसांनी सांगितले. मायकल नील वाटसन ज्युनियर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमेरिकेत सदर धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी मायकल सोशल मीडिया अकाऊंटवरुन महिला आणि तरुणींना टार्गेट करायचा. इन्स्टाग्रामवर त्यांच्याशी मैत्री करायचा. मग भेटण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा.
बलात्कार केल्यानंतर तो पीडितांकडे पैसे मागायचा. पैसे न दिल्यास त्यांचे न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करायचा. आरोपीविरोधात बलात्कार, लूट आदि 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टास्क फोर्सने आतापर्यंत 12 गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीने आतापर्यंत 13 महिला आणि चार 18 वर्षाखालील मुलींना टार्गेट केल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी गुन्ह्यात मायकलने एकच मोडस ऑपरेंडी वापरली होती.
अशी उघड झाली घटना
लॉस एंजेलिसच्या वालनट परिसरात बलात्कार आणि लूटची घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपीचे नाव मायकल नील वाटसन ज्युनियर असल्याचे उघड झाले.
इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तक्रारदार महिलेने मायकलला आपल्या घरी भेटायला बोलावले होते. मायकल महिलेच्या घरी तिला भेटायला गेला आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेचा फोन घेऊन फरार झाला होता. पोलिसांनी कसून शोध घेत अखेर मायकल अटक केली आहे.