Nagpur : नागपुरात विकृतीचा कळस! आंबा चिंच तोडण्याच्या इराद्यानं 7 अल्पवयीन मुलांवर तरुणाचा अत्याचार

Nagpur Police : नागपूरातल्या विकृत तरूणांने तब्बल सात अल्पवयीन मुलांवर अत्याचार केले आहेत. लहान मुलांना आंबा आणि चिंच तोडण्याचं कारण सांगून निर्जनस्थळी न्यायचा आणि तिथं गेल्यानंतर अत्याचार करायचा.

Nagpur : नागपुरात विकृतीचा कळस! आंबा चिंच तोडण्याच्या इराद्यानं 7 अल्पवयीन मुलांवर तरुणाचा अत्याचार
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:29 AM

नागपूर : देशात अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे. कारण रोज नव्या घटना आपण मोबाईल आणि टिव्हीच्या माध्यमातून पाहत आहोत. अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना मोबाईलमुळे (Mobile) होत असल्याची अनेक नागरिकांची ओरड आहे. विशेष म्हणजे तरूणांकडून अल्पवयीन मुली-मुलांना टार्गेट केलं जात आहे. अशाच एक प्रकार नागपूरात (Nagpur) उघडकीस आला आहे. त्यामध्ये एका विकृत तरुणाकडून सात अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिस (Police) ठाण्यात दाखल झाली आहे. अल्पवयीन मुलांना आरोपी आंबा, चिंच तोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेत होता. तिथं गेल्यानंतर अत्याचार करीत होता. तसेच कुठेही वाच्यता केल्यास द्यायचा जीवे मारण्याची धमकी द्यायचा. ही घटना नागपूरमधील वसंतराव नाईक झोपडपट्टी भागात उघसकीस आली आहे.

आंबा आणि चिंच तोडण्याचं कारण सांगून निर्जनस्थळी न्यायचा

समाजात अनेक विकृत प्रवृत्ती जन्माला आल्या आहेत असं अशा घटना कानावर आल्यानंतर वाटतं. नागपूरातल्या विकृत तरूणांने तब्बल सात अल्पवयीन मुलांवर अत्याचार केले आहेत. लहान मुलांना आंबा आणि चिंच तोडण्याचं कारण सांगून निर्जनस्थळी न्यायचा आणि तिथं गेल्यानंतर अत्याचार करायचा. तसेच या प्रकरणाची कुठेही वाच्यचा केल्यास ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्या तरूणाचं वय 28 आहे. मयूर मोडक असं नाव आहे. हा प्रकार उघडकीस आल्यापासून सदर आरोपी फरार आहे. त्याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. बर्डी पोलीस स्टेशन या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यापासून त्या परिसरात खळबळ माजली आहे. तसेच परिसरातील नागरिक अधिक संपापले आहेत.

आरोपीचा शोध सुरू

पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची भणक आरोपीला लागल्यापासून आरोपीने परिसर सोडला आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे. आरोपी ताब्यात आल्यानंतर अनेक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्या मुलांवर अत्याचार झाले आहेत. त्यांचे कुटुंबिय अत्यंत संतापले आहेत.

हे सुद्धा वाचा

अत्याचार झाल्यानंतर 9 वर्षाच्या मुलाने आईवडिलांना हकीकत सांगितली आहे. त्यानंतर हे सगळं प्रकरण उजेडात आलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.