तो परराज्यातून नाशकात आला… बँकेतील पैसे चालाकीने चोरून धूम ठोकली, पण आता…
नाशिकमध्ये पंधरा दिवसांपूर्वी बँकेतून चोरीला गेलेल्या पैशांचा जवळपास तपास पूर्ण होत आला असला तरी अद्यापही मुख्य संशयित आरोपी फरार आहे.
नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी नाशिकच्या पेठरोड परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेत 17 लाखांची जबरी चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेनं बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, या गुन्ह्यातील सतरा 17 लाखांपैकी 14 लाख पोलिस तपासात हस्तगत करण्यात आले असून मुख्य संशयित आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. नाशिकमधील या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असतांना मुख्य संशयित आरोपी हा महाराष्ट्रातील किंवा नाशिकमधील नसून तो मध्यप्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानुसार पंचवटी पोलीसांच्या एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती, त्यानुसार तांत्रिक मदती घेत मुख्य संशयित हा मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार मध्यप्रदेश येथील त्याच्या घरावर नाशिक पोलीसांनी छापा टाकला होता, त्यावेळी त्याच्या घरून चोरीला गेलेल्या पैशांपैकी चौदा लाख रुपये पोलीसांच्या हाती लागले आहे.
नाशिकमध्ये पंधरा दिवसांपूर्वी बँकेतून चोरीला गेलेल्या पैशांचा जवळपास तपास पूर्ण होत आला असला तरी अद्यापही मुख्य संशयित आरोपी फरार आहे.
पंचवटी पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने मध्यप्रदेशातून 14 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून आरोपीच्या मागावर पोलीस आहे.
यामध्ये विशेष बाब म्हणजे या गुन्ह्यातील संशयित पोलिसांच्या हाती लागले नसले तरी पोलीस पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन त्यांच्या घरातून रोकड जप्त केली आहे
पंचवटी पोलीसांच्या तपासात संशयितांनी सुरुवातीला बँकेत रेकी करून चोरी केल्याची माहिती पोलीसांच्या निदर्शनास आली आहे. यामध्ये चोरीत आत्तापर्यन्त तिघा जणांची नावे समोर आली आहे.
बँकेत रेकी केली जात असतांना सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही. मध्यप्रदेशमधील तरुण नाशिकमध्ये येऊन चोरिच कसा करू शकतो ? असे विविध प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.