Shocking Murder Cases | अपहरणानंतरचा व्हिडीओ पाहून वडील गेले होते पोलिसात, जीवलग मित्रानेच केलेली 19 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या

मंगळवार 12 सप्टेंबर 2017 रोजी शरतचं अपहरण करण्यात आलं होतं. शरतच्या ओळखीतील व्यक्तीनेच त्याचे अपहरण केलं असावं, असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच संशय होता. कारण त्याला जबरदस्ती खेचून नेल्याच्या कुठल्याचा खुणा दिसत नव्हत्या.

Shocking Murder Cases | अपहरणानंतरचा व्हिडीओ पाहून वडील गेले होते पोलिसात, जीवलग मित्रानेच केलेली 19 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या
बंगळुरुतील शरतचे अपहरण आणि हत्या प्रकरण
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 9:06 AM

मुंबई : इन्कम टॅक्स अधिकाऱ्याच्या 19 वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाने 2017 मध्ये बंगळुरु हादरले होते. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या शरतचं (Sharath) अपहरण करण्यात आलं होतं, मात्र शरतच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केल्याचं समजल्यानंतर काही तासांतच त्याची गळा आवळून हत्याही करण्यात आली. बंगळुरु शहरापासून लांब असलेल्या एका तलावाजवळ शरतचा मृतदेह पुरण्यात आला होता. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निघाला तो त्याचाच जीवश्च कंठश्च मित्र. नवीन बाईक मित्रांना दाखवण्यासाठी गेलेला असतानाच शरतचं त्यांनी अपहरण केलं होतं.

शरतच्या निकटवर्तीयांवर संशय

मंगळवार 12 सप्टेंबर 2017 रोजी शरतचं अपहरण करण्यात आलं होतं. शरतच्या ओळखीतील व्यक्तीनेच त्याचे अपहरण केलं असावं, असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच संशय होता. कारण त्याला जबरदस्ती खेचून नेल्याच्या कुठल्याचा खुणा दिसत नव्हत्या. शरतच्या वडिलांनी अपहरणाची केस दाखल केल्यानंतर ज्ञानभारती पोलिसांनी आधी त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शेजारी, कॉलेजमधील मित्र यांची चौकशी केली.

शरतच्या अत्यंत निकटवर्तीय व्यक्तीनेच ही हत्या केली आहे, यावर पोलीस ठाम होते. गेल्या काही काळात शरतविषयी अचानक कोणी अतोनात प्रेम दाखवत होतं का, असा प्रश्न पोलिसांनी शरतच्या वडिलांना विचारला. तेव्हा नाव समोर आलं विशालचं. विशालचं जवळपास दररोज आपल्या घरी येणं-जाणं असल्याचा उल्लेख शरतच्या वडिलांनी केला. पोलिसांच्या संशयाची सुई विशालवर स्थिरावली.

दुसरीकडे, विशाल सातत्याने शरतच्या बहिणीच्या संपर्कात होता. पोलिस तपासाविषयी कुटुंबाला मिळणारे सगळे अपडेट्स विशाल तिच्याकडून जाणून घेत होता.

विशाल आणि शरतचे फोन लोकेशन

विशालवर पोलिसांचा संशय बळावला होता. त्यांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या फोनच्या जीपीएसमधून त्याचं लोकेशन आणि कॉल रेकॉर्डही तपासण्यात आले. अपहरणाच्या रात्री शरत आणि विशाल यांचे फोन एकाच जागी असल्याचं पोलिसांना समजलं. विशालचे मित्र विकी आणि विनोद हे रामोहल्ली आणि अज्जनाकट्टे तलाव (जिथे शरतचा मृतदेह सापडला) परिसरात वारंवार जात असल्याचं पोलिसांना समजलं.

कर्ज फेडण्यासाठी अपहरण

काही दिवसांनी विशाल आणि त्याच्या मित्रांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी तिघांनी अपहरण आणि हत्या प्रकरणातील सहभागाची कबुली दिली. या तिघांनाही कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. केवळ कर्ज फेडण्याच्या इराद्याने विशालने मित्राचं अपहरण करुन त्याचा जीव घेतला होता.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असलेल्या अज्जनाकट्टे तलावाजवळ नेलं. तिथे त्यांनी शरतला कुठे पुरलं, हे दाखवलं. अपहरण-हत्येनंतर जवळपास दहा दिवसांनी (शुक्रवार 23 सप्टेंबर 2017) अज्जनाकट्टे तलावापासून तीन किलोमीटर अंतरावर शरतचा मृतदेह सापडला. मात्र तो संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिथेच मंडप उभारुन त्याची ऑटोप्सी करण्यात आली.

त्या दिवशी काय झालं होतं?

शरतने नुकतीच एक नवीन बाईक विकत घेतली होती. ही बाईक मित्रांना दाखवण्यासाठी शरत निघाला होता. मात्र एका निर्जन जागी त्याला थांबवून मारुती स्विफ्ट कारमध्ये त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी शरतला एक व्हॉट्सअॅप व्हिडीओ रेकॉर्ड करुन कुटुंबीयांना पाठवण्यास सांगितला. त्यानुसार शरतने तो पाठवलाही “त्यांच्याकडे घातक शस्त्र आहेत. प्लीज पोलिसांना सांगू नका, त्यांनी मागितलेली खंडणीची रक्कम (50 लाख रुपये) देऊन टाका, माझ्यावरच हे थांबू द्या, नाहीतर ते माझ्या बहिणीलाही धोका पोहोचवतील. त्यांच्याकडे सगळी माहिती आहे. कृपया लवकरात लवकर पैसे द्या” असं तो व्हिडीओत म्हणाला होता. मात्र त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

दोरखंडाने गळा आवळून जीव घेतला

शरत आणि त्याचे अपहरणकर्ते – विनय प्रसाद उर्फ विकी, करण पै, विनोद कुमार, उबर चालक शांता कुमार हे अपहरणासाठी वापरलेल्या कारमध्येच होते. रात्री 11.30 वाजता विशालने तिघा जणांपैकी एकाला फोन केला आणि शरतच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याचं सांगितलं. विशालने शरतला जीवे मारण्याचे आदेश दिले. चौघांकडे सुरा आणि दोरखंड होता. सुरुवातीलाच चाकूने भोसकून त्याची हत्या करण्याचा चौघांचा इरादा होता, मात्र त्यांनी दोरखंडाने गळा आवळून शरतला संपवलं.

शरतचा मृतदेह मागच्या सीटखाली ठेवण्यात आला. विकी ड्राईव्ह करत होता, तर करण त्याच्या बाजूला बसला होता. इतर दोघं मागे बसले होते. रात्री 1 वाजताच्या सुमारास ते रामोहल्ली तलावाजवळ पोहोचले. त्याचा मृतदेह तलावात टाकण्याचा विचार करत असतानाच त्यांच्या लक्षात आले, की बॉडी काही काळाने तरंगून पाण्यावर येईल. त्यामुळे त्यांनी अज्जनाकट्टे तलावाजवळ त्याचा मृतदेह पुरला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचं बिंग फुटलंच

संबंधित बातम्या :

Snehal Gaware Murder | बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह

Sunanda Pushkar | थरुर, तरार आणि थरार! पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत ट्विटरवॉरच्या दुसऱ्याच दिवशी झालेला सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.