तिने बहिणीच्या नवऱ्याशी संबंध ठेवले, प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीने थेट जन्मदात्यालाच…
एकदा सुरेंद्र कुमार आणि काजल यांना मयत उपेंद्र यांचा भाचा परीक्षेसाठी घरी आला असताना नको त्या अवस्थेत पाहीले. त्याने मामाला जाऊन हा प्रकार सांगितला.
नवादा : त्यांच्या लग्नाला आठ वर्षे होऊनही त्यांच्या पोटी मुल काही जन्माला आले नाही. म्हणून त्याने आपल्या सासरी आजाराच्या निमित्ताने मुक्काम वाढवित पत्नीच्या लहान बहिणीशी म्हणजेच मेहुणीशी संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे एकदा परीक्षेसाठी आलेल्या भाच्याने या दोघांना नको त्या अवस्थेत पाहीले आणि प्रेमात पागल झालेल्या मुलीने ज्याने जन्माला घातले त्या पित्यालाच आपल्या मेहुण्याच्या मदतीने संपविल्याची बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी भयंकर घटना उघडकीस आली आहे.
बिहारच्या नवादामध्ये एका बांधावर गेल्या महिन्यात 6 मार्च 2023 रोजी उपेंद्र चौरसिया यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा रहस्यभेट दीड महिन्यांनी झाला आहे. या प्रकरणात मयताच्या मुलगी पूजा देवी हिच्या जबानीवरून तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपेंद्र यांच्या खूनी स्वत: त्यांचा जावई आणि लहान मुलगी असल्याचे उघडकीस आले आहे.
मुलबाळ झाले नाही
पूजा देवी हीचा विवाह आठ वर्षांपूर्वी शेखपुरा जिल्ह्यातील खखरा गावच्या सुरेंद्र कुमार बरोबर झाला होता. परंतू त्यांना काही मुलबाळ झाले नाही. मुलाच्या इच्छेसाठी सुरेंद्र कुमार याने त्याच्या पत्नीवर अनेक ठीकाणी उपचार करून पाहीले परंतू काही फरक झाला नाही. त्यानंतर मयत उपेंद्र यांच्या दुसरी मुलगी काजल बरोबर सुरेंद्र कुमार याचे शारीरिक संबंध सुरू झाले. त्यांनी गुपचुप लग्नही करायचेही ठरविले. परंतू त्याच्या सासरे उपेंद्र यांना काही माहीती नव्हते. त्यामुळे जावई सुरेंद्र कुमार आणि काजल यांनी उपेंद्र यांचा काटा काढायचा प्लान रचला. म्हणजे दोघांनीही आपले संबंध कायम ठेवता येतील आणि लग्नही करता येईल.
नको त्या अवस्थेत पाहीले
एकदा सुरेंद्र कुमार आणि काजल यांना मयत उपेंद्र यांचा भाचा परीक्षेसाठी घरी आला असताना नको त्या अवस्थेत पाहीले. त्याने मामाला जाऊन हा प्रकार सांगितला. त्यामुळे चिडलेल्या उपेंद्र यांनी आपल्या जावयाला पुन्हा त्याच्या घरी शेखपुरा येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. उपचाराच्या नावाखाली त्याचा जावई सासुरवाडीचा पाहुणचार झोडत होता. आपले बिंग फुटल्याने जावयाने आणि त्याच्या मेहुणीने कट रचून उपेंद्र यांना शेताच्या बांधावर डोक्यात वजनी वस्तू टाकून हत्या केली. या प्रकरणात जावई सुरेंद्र कुमार आणि मुलगी काजल कुमारी या दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.