‘हा’ माझा बायको पार्वती… पत्नीला पुरुषांचं जननेंद्रिय, फसवणुकीचा दावा करत नवरा सुप्रीम कोर्टात
तरुणाची पत्नी "पुरुष" असल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) अंतर्गत फौजदारी गुन्हा घडला आहे, असं तरुणातर्फे ज्येष्ठ वकील एनके मोदी यांनी खंडपीठाला सांगितले.
नवी दिल्ली : ‘अशी ही बनवाबनवी’ या सुप्रसिद्ध सिनेमातील ”हा’ माझा बायको पार्वती’ हा डायलॉग खूपच फेमस आहे. त्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे… पुरुषाचे जननेंद्रिय असतानाही फसवणूक केल्याबद्दल आपल्या ‘पत्नी’वर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी करणाऱ्या तरुणाच्या याचिकेची तपासणी करण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शुक्रवारी सहमती दर्शवली. सुरुवातीला या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने नापसंती दर्शवली होती. पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय असल्याचे उघड करणारा वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतर कोर्टाने पत्नीकडून उत्तर मागितले. इम्परफोरेट हायमेन (imperforate hymen) हा एक जन्मजात विकार आहे ज्यामध्ये हायमेन योनीमार्गात पूर्णपणे अडथळा निर्माण करतो.
काय आहे प्रकरण?
तरुणाची पत्नी “पुरुष” असल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) अंतर्गत फौजदारी गुन्हा घडला आहे, असं तरुणातर्फे ज्येष्ठ वकील एनके मोदी यांनी खंडपीठाला सांगितले.
“ती एक पुरुष आहे. ही निश्चितच फसवणूक आहे. कृपया वैद्यकीय नोंदी पहा. हे काही जन्मजात विकाराचे प्रकरण नाही. एका पुरुषाशी लग्न करुन माझ्या अशिलाची फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे. तिला तिच्या गुप्तांगाबद्दल निश्चितपणे माहिती होती” यावर वकिलांनी जोर दिला.
कोर्टीचे काय प्रश्न?
“केवळ इम्परफोरेट हायमेन आहे, म्हणून ती स्त्रीलिंगी नाही, असे तुम्ही म्हणू शकता का? तिच्या अंडाशय सामान्य असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.” असा प्रश्न कोर्टाने विचारला.
“केवळ ‘बायको’ला इम्परफोरेट हायमेनच नाही, तर पुरुषाचे लिंग देखील आहे. रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल हे स्पष्टपणे सांगतो. पुरुषाचे जननेंद्रिय असताना ती स्त्री कशी असू शकते?” असे प्रत्युत्तर तरुणाच्या वकिलांनी दिले.
तरुणाची मागणी काय?
“तुमच्या अशिलाची नेमकी मागणी काय आहे?” असे खंडपीठाने विचारले असता, एफआयआरवर योग्य ती कारवाई व्हावी, तसंच त्याला फसवल्याबद्दल आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पत्नीला कायदेशीर परिणाम भोगायला लागावेत, अशी तरुणाची इच्छा असल्याचं वकिलांनी सांगितलं. खंडपीठाने पत्नी, तिचे वडील आणि मध्य प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत उत्तर मागितले.
दुसरीकडे, पत्नीने असा दावा केला की पतीने तिच्याकडे अतिरिक्त हुंड्याची मागणी करत तिच्याशी क्रूरतेने वागणूक दिली. तसंच कौटुंबिक समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली.
संबंधित बातम्या :
VIDEO | स्टेशनवर किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा, बिचाऱ्यांवर जीआरपीकडून गुन्हा
होम स्टे मालकाकडे 2000 हून अधिक जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ, सिक्रेट कॅमेराने खासगी क्षणांचं शूटिंग
अश्शी बायको नको गं बाई! पत्नीकडून माझा छळ, एकट्या औरंगाबादेत 285 नवऱ्यांच्या तक्रारी