स्वतःचंच कुंकू पुसलं, प्रेमासाठी प्रियकराची मदत घेऊन पत्नीने काय केलं?
संशयित आरोपी मनीषा झाल्टे कातरवाडी येथीलच सुभाष संसारे याच्याशी गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध आहेत.
चांदवड : नाशिकच्या कातरवाडी येथील खुनाच्या घटनेची पोलीसांनी (Nashik Police) उकल करताच धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या कातरवाडी येथे एका तरुण शेतकऱ्यांच्या खुनाची (Murder) घटना समोर आली होती. 48 तासांतच नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी या घटनेची उकल केली आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच नवऱ्याचा खून केल्याची बाब समोर आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये पतीची अडचण येत असल्याने पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने सोपान झाल्टेचा यांची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. पत्नी मळ्यात झोपायला गेल्याची माहिती पत्नीने प्रियकराला दिली होती. त्यात प्रियकराने मित्रांच्या सहाय्याने लाकडी दांडक्याने सोपान झाल्टे यांच्या डोक्यात मारत त्यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. त्यात सोपान यांचे वडील मध्ये आल्याने त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली असून ते गंभीर जखमी आहेत. या खुनाची उकल करण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाने पत्नीला विचारपूस केल्याने उलट-सुलट उत्तरे दिल्याने पोलीसांना संशय आला होता.
संशयित आरोपी मनीषा झाल्टे कातरवाडी येथीलच सुभाष संसारे याच्याशी गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध आहेत.
सोपान झाल्टेचा यांचा या अनैतिक संबंधात अडचण येत असल्याने त्यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन पत्नी मनीषा आणि प्रियकर सुभाष यांनी आखला होता.
सोपान हे ट्रक आणि शेतीचा व्यवसाय करत होते, ते घरी आल्याची माहिती पत्नी मनीषा हिने प्रियकर सुभाष याला दिली होती.
मनमाड येथील खलील नावाच्या मित्राला घेऊन सुभाष याने सोपान यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकत लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली आणि जीवे ठार मारले आहे.
यातील तिघाही आरोपींना नाशिक ग्रामीण पोलीसांनी अटक केली असून अधिकचा तपास केला जात आहे. पंचक्रोशीत ही माहिती पसरताच या खुनाच्या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.