रात्रीच्या वेळेस त्याने दार ठोकलं , मात्र मनात काही वेगळंच होतं, दार उघडताच दिसेल त्याच्यावर केला वार, तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली !

शिर्डीजवळ झालेल्या तिहेरी हत्याकांडाने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात आणखी तिघे जण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

रात्रीच्या वेळेस त्याने दार ठोकलं , मात्र मनात काही वेगळंच होतं, दार उघडताच दिसेल त्याच्यावर केला वार, तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली !
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 2:36 PM

अहमदनगर | 21 सप्टेंबर 2023 : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ एका धक्कादायक घटना घडली आहे. तिहेरी हत्याकांडाने (triple murder case)संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यामध्ये दोन महिला व एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे. मात्र ही हत्या कोणी केली हे समोर आल्यावर सर्वच हादरले. जावयानेच पत्नी, मेव्हणा यांची हत्या केली एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या आजेसासूला देखील सोडलं नाही व त्यांचाही जीव घेतला. या खळबळनक घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

काल रात्रीच्या उशीराच्या सुमारास हा प्रकार घडला. कौटुंबिक वादामुळे तिघांना जीव गमवावा लागला आहे. तर या हल्ल्यात आणखी तिघेही जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन निकम या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

तिथे नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातू हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात हा रक्तपात घडला. रात्री ११ च्या सुमारास घरात आलेल्या जावयाने पत्नी, मेव्हणा व आजेसासू यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. तर इतर तिघांवरही हल्ला केला. यामध्ये आरोपीची सासू, सासरे आणि मेव्हणी हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्या तिघांवरही शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आरोपी सुरेश निकम हा रात्री ११ च्या सुमारास त्याच्या सासरी गेला आणि दार वाजवू लागला. मात्र त्याच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. दार उघडलं जाताच त्याने मागता पुढचा काहीही विचार न करता, समोर दिसेल त्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. यामध्ये आरोपीची पत्नी वर्षा सुरेश निकम (वय २४), मेव्हणा रोहित गायकवाड (वय २५) आणि आजेसासू हिराबाई गायकवाड ( वय ७०) या तिघांचाही जीव गेला.

तर आरोपीचे सासरे चांगदेव गायकवाड (वय ५५), सासूबाई संगीता गायकवाड ( वय ४५) आणि त्या मेव्हणी योगिता जाधव (वय ३०) हे तिघेही जबर जखमी झाले. या हत्याकांडाप्रकरणी पोलीसांनी आरोपी सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. तसेच त्याचा चुलत भाऊ देखील पोलिसांचा ताब्यात आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.