Video : दूध टँकरने पती-पत्नीला चिरडलं! पती जागीच ठार, पत्नीची मृत्यूशी झुंज, पाहा सीसीटीव्ही
रस्त्यावरील अर्धवट कामामुळे निष्पाप दाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त! हृदयद्रावक घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर, पाहा व्हिडीओ
अहमदनगर : अहमदनगर-मनमाड महामार्गावर बाभळेश्वर चौकात दुचाकीवरुन जात असलेल्या दाम्पत्याला एका दूध टँकरने चिरडलं. या भीषण अपघाताचं अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या दुर्दैवी घटना पतीचा मृत्यू झाला होता. तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. सध्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. चौकापासून हाकेच्या अंतरावर लागलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली.
भरदिवसा झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर चौकात एकच खळबळ उडाली होती. डाव्या बाजूला वळणाऱ्या टँकरने दुचाकीवरुन जात असलेल्या पती-पतीला धडक दिली.
हा अपघात इतकं भयंकर होता की दोघाही पतीपत्नीच्या अंगावर दुधाच्या टँकरचं डावं चाक गेलं. यात दोघांनाही गंभीर जखम झाली. यातील पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. सध्या त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
पाहा व्हिडीओ : ही दृश्य तुम्हाला विचलीत करु शकतात
नवरा बायको दुचाकीवरुन जात असताना भीषण अपघात, दूध टँकरने स्कूटीला चिरडलं, टँकरचं डावं चाक अंगावरुन गेल्यानं पती जागीच ठार, पत्नी गंभीररीत्या जखमी, नगर-मनमाड हायवेवरील भीषण अपघात (VC : मनोज गडेकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) #AccidentCCTV #Accident #CCTV #WATCH pic.twitter.com/WkENojfjKN
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 8, 2022
दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. चौकात अनेक वाहनं असलेल्यामुळे दुधाच्या टँकरचा वेगही फार नव्हता. दुचाकी डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात होती. तेव्हा हा अनर्थ घडला.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि बाभळेश्वर चौकातील अर्धवट कामामुळे हा दुर्दैवी अपघात घडला. या चौकातील ठिकाण ब्लँक स्पॉट ठरत असल्याचं अनेक अपघातांमुळे अधोरेखित झालंय. या दुर्दैवी अपघातामध्ये पिंप्री निर्मळ येथील 54 वर्षीय उत्तम पाखरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंदवून घेतला आहे.