Sangli : सांगलीत शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण, शिंदे गटात येण्यासाठी मारल्याचा आरोप

पोलिसांनी शिंदे गटातील सहा ते सात जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sangli : सांगलीत शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण, शिंदे गटात येण्यासाठी मारल्याचा आरोप
सांगलीत शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 9:46 PM

सांगली : इस्लामपूरमधील शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे (Pratibha Shinde) यांच्या पतीला आज सकाळी सात ते आठ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण (Beating) केल्याची घटना सांगलीत घडली आहे. शिवकुमार शिंदे (Shivkumar Shinde) असे मारहाण झालेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी ही मारहाण झाल्याचा आरोप प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती शिवकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मारहाणीत शिवकुमार शिंदे जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शिंदे यांना मिरज रोडवरील भारती हॉस्पिटल येथे ICU मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

मारहाण प्रकरणी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे गटातील सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी शिंदेंनी केला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद पवार हे शिंदे गटात या अशा धमक्या देत असल्याने आम्ही शिवसेनेच्या पदाचा राजीनामा पाठवला होता. तरी आज सकाळी दूध आणण्यासाठी गेले असता टोळक्याकडून अचानक मारहाण झाल्याची माहिती शिवकुमार शिंदे यांनी दिली. तर पोलिसांनी शिंदे गटातील सहा ते सात जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना शिंदे पती-पत्नीचा आरोप फेटाळला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Shiv Sena woman corporators husband beaten up in Islampur in Sangli)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.